स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते(Aai Kuthe Kay Karte)ने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील अरुंधती, अनिरुद्ध, आप्पा, कांचन आई, यश, अभिषेक, अनघा, ईशा आणि संंजना या पात्रांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. याशिवाय आशुतोष, नितीन आणि संजनाचा आधीचा नवरा शेखर या पात्रांनादेखील प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. शेखरची भूमिका अभिनेता मयुर खांडगे(Mayur Khandge)ने साकारली आहे.
अभिनेता मयुर खांडगे सोशल मीडियावर सक्रिय असून तो या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असतो. लवकरच त्याच्या 'हब्बडी'चा १७ जुलै २०२२ रोजी झी मराठीवर जागतिक टेलिव्हिजन प्रीमियर होईल आणि १८ जुलैपासून नेटफ्लिक्सवरही तो प्रसारित होईल.हा चित्रपट दर्शकांना तरुण मन्याच्या जगात पोहोचवण्याचे काम करतो, जो एक अनाथ असून भित्र्या स्वभावाचा असतो. अनेक मुले त्याची खोडी काढत राहतात. परंतु त्याचे मन खूप जिज्ञासू असून त्याच्यात सर्व अडथळ्यांवर मात करण्याची प्रबळ इच्छाशक्ती आहे.एक कब्बडी सामना म्हणजे त्याचे जीवन बदलण्याची एक संधी आहे. हा चित्रपट एका रोमांचक निकालापर्यंत आपल्याला घेऊन जातो ज्यामुळे हसू आणि आनंदी अश्रू दोन्ही येतील.
दिग्दर्शक नचिकेत सामंत यांनी सांगितले की, "हबड्डी' ही मूलत: एका अंडरडॉगची कथा आहे. त्यात 'ऑलिव्हर ट्विस्ट'च्या छटा आहेत आणि एक चॅपलीनस्क गुण देखील पहायला मिळतो. जो हसू, अश्रू पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे आशा जागवतो. कबड्डी हा खेळ चित्रपटाचा मध्यवर्ती विषय असल्याने, तो सर्व अडचणींवर मात करण्याचा संदेश देतो. हा चित्रपट लोकांना शिकवेल की कोणीही कधीही कमकुवत किंवा तुटलेला नसतो. 'हब्बडी'चा संदेश हा आहे की आपण सर्वजण आपल्या स्वतःच्या कथांचे नायक बनू शकतो."