आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेनं अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेच्या कथानक आणि पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत अनिरुद्धची भूमिका अभिनेता मिलिंद गवळी(Milind Gawali)ने साकारली आहे. त्याच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. मिलिंद गवळी सोशल मीडियावर सक्रीय असून तो या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असतो. दरम्यान नुकताच त्याने इंस्टाग्रामवर पत्नीसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत.
मिलिंद गवळी यांच्या पत्नीचं नाव दीपा गवळी असून त्या लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करतात. मिलिंद आणि दीपा गवळी यांच्या लग्नाचा काल वाढदिवस होता. त्यानिमित्ताने अभिनेत्याने स्पेशल व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करून त्याने लिहिले की, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दीपा. या व्हिडीओत मिलिंद गवळी आणि दीपा गवळी यांच्या लग्नातील काही फोटो पाहायला मिळत आहेत. तसेच त्यांचे आताचेही काही व्हिडीओ पाहायला मिळत आहेत.
मिलिंद गवळी यांची लव्हस्टोरी खूप हटके आहे. अभिनेत्याने आपल्या पत्नीला जळगाव रेल्वे स्टेशन वर पाहिले आणि पहिल्या नजरेत तो तिच्या प्रेमात पडला. तेव्हा तिच्याबद्दल काहीच माहित नव्हते. मात्र या दोघांची पुन्हा भेट एका नातेवाईकाच्या लग्नसमारंभात झाली. त्यानंतर मिलिंदने तिची सर्व माहिती काढली. दीपाची माहिती मिळाल्यानंतर त्याने आपल्या कुटुंबियांना सांगितले. दीपा ही त्यांच्या नात्यातलीच आहे, त्याला काही दिवसांनी समजले.
मिलिंदच्या घरचे दीपाला मागणी घालण्यासाठी तिच्या घरी गेले. त्यावर दिपाच्या घरातल्यांनी एक अट ठेवली होती. ती अट म्हणजे जावई सरकारी नोकरीवाला हवा. मिलिंदने ही अट मान्य केली. मिलिंद स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागला आणि त्यानंतर तो परीक्षाही पास झाला. सरकारी नोकरी लागल्यानंतरच या दोघांचे लग्न झाले. दीपा आणि मिलिंद यांना एक मुलगी आहे. तिचे लग्न झाले आहे.