Join us

Aai Kuthe Kay Karte : अरूंधती अडकणार लग्नबेडीत?; त्या फोटोमुळे चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 14:06 IST

Aai Kuthe Kay Karte : सध्या मालिकेत अभिषेक आणि अनघाचे लग्न पार पडणार आहे. परंतु, सोशल मीडियावर अरूंधतीदेखील लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरू आहे.

आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका मराठी टेलिव्हिजनवरील नंबर वनची मालिका आहे. या मालिकेला सुरूवातीपासूनच प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. या मालिकेतील आई म्हणजेच अरुंधती या पात्राने प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. दरम्यान ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. सध्या मालिकेत अभिषेक आणि अनघाची लगीनघाई सुरू आहे. परंतु, सोशल मीडियावर अरूंधतीदेखील लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावरील एका फोटोमुळे या चर्चेला उधाण आले आहे.

आई कुठे काय करते मालिकेत सध्या अरूंधतीचा मोठा मुलगा म्हणजेच अभिषेक आणि अनघाचे लग्न पार पडणार आहे. त्यामुळे घरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. मेहंदी सेरेमनी, संगीत आणि हळदीचा कार्यक्रम मालिकेत पार पडताना दिसला. दरम्यान या मालिकेतील अरुंधती म्हणजेच मधुराणी प्रभुलकर हिने सेटवरील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवरूनच अरुंधतीदेखील लग्न करणार या चर्चेला उधाण आले. तर हा फोटो आहे अरूंधतीच्या हातावरील मेहंदीचा. तिच्या हातावर काढलेल्या मेहंदीत ए लिहिले आहे.

ए म्हटलं तर अरुंधती, ए म्हटलं तर अनिरूद्ध आणि ए म्हटलं तर आशुतोषही असू शकतं. आता अरूंधतीच्या आयुष्यात अनिरूद्धला काहीच स्थान नसल्यामुळे त्याचा ए नसेल. मग उरलं कोण तर आशुतोष. या फोटोवरून बरेच तर्कवितर्क लावताना दिसत आहे.

टॅग्स :आई कुठे काय करते मालिका