Join us

'आई कुठे...'चा Video व्हायरल, गालाला रंग लावल्याने अरुंधती भडकली; अनिरुद्धच्या मारली कानाखाली;

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 10:09 IST

आशुतोषलाच रंग लावायचा अधिकार म्हणत अनिरुद्धच्या कानाखाली काढला जाळ

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) मालिकेतील सध्याच्या ट्विस्टमुळे प्रेक्षक संतापले आहेत. मालिका लवकर बंद करावी अशीही मागणी प्रेक्षकांनी केली आहे. मात्र निर्मात्यांनी स्पष्टीकरण देत मालिका मुद्दामूनच अशा वळणाला आणल्याचं सांगितलंय. आशुतोषच्या मृत्यूनंतर आता अरुंधती पुन्हा अनिरुद्धच्या घरी आली आहे. दोघांमध्ये जवळीक वाढणार का असा प्लॉट सध्या दाखवण्यात येतोय. त्यातच होळीच्या सणाला त्यांच्यात असं काही घडतं की अरुंधती अनिरुद्धच्या थेट कानाखाली मारताना दिसते. याचा प्रोमो व्हायरल होतोय.

आशुतोषच्या निधनानंतर कांचन आजी अरुंधतीला पुन्हा घरी घेऊन येते. कांचन आणि अनिरुद्धचा अरुंधतीशी जवळीक साधण्याचा आधीपासूनच डाव असतो. आशुतोषच्या मृत्यूने ते आता आणखी सोपं होतं. दरम्यान होळीच्या सणाला जेव्हा सगळेजण रंग खेळत असतात तेव्हा अरुंधती आशुतोषच्या आठवणीत हरवून जाते. तोच समोरुन अनिरुद्ध येतो आणि अरुंधतीच्या गालाला रंग लावतो, हॅपी होली म्हणतो. यानंतर अरुंधती भानावर येते आणि अनिरुद्धच्या थेट कानाखालीच आवाज काढते. 'मला रंग लावायचा अधिकार केवळ आशुतोषला आहे आणि कायम त्यांनाच राहील' असं ती त्याला रागात म्हणते. कांचन आणि अनिरुद्ध चकितच होतात. तोच संजना डाव साधत येते आणि अनिरुद्धला रंग लावत म्हणते, 'चेहऱ्यावरचा रंग उडाला की रे तुझ्या, हॅपी होली!'  serialjatra या इन्स्टाग्राम पेजवर प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

'आई कुठे काय करते' मालिका सुरुवातीला प्रचंड लोकप्रिय झाली होती. मात्र नंतर हळूहळू मालिकेचा टीआरपी घसरला. आता तर मालिकेची वेळही बदलली आहे. संध्याकाळचा 7 चा प्राईम स्लॉट सोडून आता मालिका दुपारी अडीच वाजता प्रक्षेपित होत आहे. 'अरुंधतीचा नवा प्रवास' सध्या मालिकेत दाखवण्यात येतोय. तर सोशल मीडियावर मालिका प्रचंड ट्रोल होत आहे.

 

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकामधुराणी प्रभुलकरमिलिंद गवळीटिव्ही कलाकार