छोट्या पडद्यावरील विविध मालिकांमध्ये काम करणा-या कलाकारांचं शेड्युल भलतंच बिझी असतं. दिवसाचे १७ ते १८ तासांचं शुटिंग यामुळे त्यांचा बराच वेळ हा मालिकांच्या सेटवरच जातो. या सगळ्या गोष्टींमुळे मालिकांमध्ये काम करणा-या कलाकारांसाठी मालिकेचा सेट जणू दुसरं घर आणि मालिकेतील कलाकार मिळून एक नवं कुटुंब बनतं. मालिकेतील कलाकारांमध्ये काम करता करता एक जिव्हाळ्याचं नातं निर्माण होतं. सेटवरच विविध सणांचे सेलिब्रेशन आणि वाढदिवस साजरे होतात. परिणामी मालिकेतील या कलाकारांमध्ये प्रेमाचे आणि आपुलकीचे बंध निर्माण होतात. असंच काहीसं नातं छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' मालिकेतील कलाकारांमध्ये पाहायला मिळते.
'आई कुठे काय करते' ही मालिका दिवसेंदिवस रंजक वळणावर आली आहे. मालिकेतल्या रंजक घडामोडी रसिकांना खिळून ठेवण्यात यशस्वी ठरत आहेत. त्यामुळे मालिकेच्या पहिल्या भागापासासूनच ही मालिका रसिकांची आवडती मालिका बनली आहे. टीआरपीच्या बाबतीतही मालिकने अव्वल स्थान मिळवले आहे. मालिकेतल्या सगळ्याच भूमिका रसिकांच्या आवडत्या आहेत. गौरी हे पात्र देखील रसिकांना खूप आवडते. गौरी ही भूमिका अभिनेत्री गौरी कुलकर्णीने साकारली आहे. नुकत्याच एक मुलाखतीत तिने काही गोष्टींचा खुलासा केला. अरुंधती आणि संजना यांच्याबद्दल तिने काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. सेटवर अरुंधती आणि संजना दोघीही मला खूप त्रास देतात. मला एकदा रुपाली भोसलेने नेसलेली साडी आवडली होती. साडी तिने मला व्हिडीओ कॉल करुन दाखवली आणि मला आवडल्याचे समजताच तिने मला खूप चिडवले. मालिकेतल्या सगळ्याच कलाकारांसोबत खूप चांगले बॉन्डींग निर्माण झाले आहे. मुळात खेळीमेळीचे वातावरण असते त्यामुळे शूटिंग करण्यातही खूप मजा येते असे तिने सांगितले.