कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका आई तुळजाभवानी मालिकेमध्ये माता पार्वतीच्या तुळजाभवानी अवताराची विलक्षण रंजक गोष्ट सध्या उलगडत असून येत्या रविवारी दोन फेब्रुवारीला माघी गणेश जयंती विशेष भाग देवी भक्तांसाठी खास ठरणार आहे. शिवकन्या अशोकसुंदरीच्या आवाहनानुसार पृथ्वीवर बालगणेश प्रकट झाले आहेत. तुळजाभवानी रुपातली आई पार्वती आणि भवानीशंकर रुपातले महादेव या दोघांमधला दुरावा मिटवून त्यांना एकत्र आणण्याची योजना ही दोन्ही भावंडे आखतात, त्यासाठी निमित्त ठरते बालगणेशाच्या जन्मदिवसाचे अर्थात माघी गणेशजयंतीचे.
दरवर्षीप्रमाणे तुळजाभवानी रुपातल्या पार्वतीने बालगणेशाच्या जन्मदिवसाची तयारी केली आहे. अशोक सुंदरीप्रमाणे बालगणेश येतील अशी अपेक्षा देवीला आहे,मात्र बालगणेश खट्याळ बालकाच्या रूपात येतात आणि देवींच्या सहनशक्तीची परीक्षा पाहतात. या दैवी लीलेपाठी गणेशांचा खट्याळपणा असला तरी देवीच्या अढळस्थानाशी ही लीला निगडीत आहे. तुळजापुरातल्या भव्य निर्मितीचा श्री गणेशा ठरलेली ही बाललीला नेमकी काय असेल याची प्रचंड उत्सुकता असलेला मालिकेचा हा भाग येत्या रविवारी २ फेब्रुवारीला दु १.०० वा. आणि रात्री ९.०० वा. उलगडणार आहे.
बालगणेश खट्याळ दैवी लीला रचून आई तुळजाभवानीचे कुटुंब एकत्र आणू शकेल का ? आई तुळजाभवानी मालिकेमध्ये. आई तुळजाभवानी मालिकेचा विशेष भाग येत्या रविवारी २ फेब्रुवारीला दु १.०० वा. आणि रात्री ९.०० वा आपल्या कलर्स मराठीवर बघायला मिळेल. आई तुळजाभवानी मालिकेच्या या खास भागाने मालिकेत रंजक वळण येणार यात शंका नाही.