Join us

भक्तांच्या हाकेला धावणार, दुर्जनांचा नाश करणार! अष्टभुजा 'आई तुळजाभवानी' मालिकेचा जबरदस्त टीझर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 10:42 IST

'आई तुळजाभवानी' मालिकेचा जबरदस्त टीझर रिलीज झाला असून प्रेक्षकांनीही या टीझरला पसंती दिलीय (aai tuljabhawani)

कलर्स मराठीवर सध्या बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनची चांगलीच क्रेझ आहे. बिग बॉस मराठीचा नवीन सीझन सुरु होऊन १ महिना पूर्ण झालाय. शोचा TRP  वाढत आहे. अशातच कलर्स मराठीवर काहीच दिवसांपूर्वी 'दुर्गा' ही नवी मालिका सुरु झालीय. नव्या मालिकेची चर्चा सुरु असतानाच कलर्स मराठीवर आणखी एक नवीन मालिका लवकरच सुरु होणार आहे. 'आई तुळजाभवानी' असं या मालिकेचं नाव असून या मालिकेचा प्रोमो नुकताच रिलीज झालाय.

आई तुळजाभवानी मालिकेचा प्रोमो

आई तुळजाभवानीचा उदो उदो... हा जयघोष संपूर्ण महाराष्ट्रात होताना दिसतो. आता कलर्स मराठीवर 'आई तुळजाभवानी' ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भक्तांच्या हाकेला धावून येणार, दुर्जनांच्या नाशासाठी अष्टभुजा 'आई तुळजाभवानी' प्रकटणार, अशी घोषणा करत 'आई तुळजाभवानी' मालिकेचा प्रोमो टीझर काल रात्री 'कलर्स मराठी'वर प्रदर्शित झाला आहे.

आई तुळजाभवानीच्या रुपात कोण दिसणार?

मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली. ‘आई तुळजाभवानी'च्या रुपात कोण दिसणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना आता उत्सुकता आहे. दरम्यान प्रेक्षकांनी मात्र तुळजाभवानीच्या रुपात कोणती अभिनेत्री दिसणार याचा अंदाज लावायला सुरुवात केलीय. अवघ्या महाराष्ट्राची 'कुलस्वामिनी' अर्थात 'आई तुळजाभवानी' लवकरच प्रेक्षकांना आपल्या लाडक्या 'कलर्स मराठी'वर पाहायला मिळणार आहे. मालिका कधीपासून सुरु होणार, हे लवकरच जाहीर करण्यात येईल.

टॅग्स :कलर्स मराठीमराठीमराठी अभिनेता