Join us

'आप के आज जानसे' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2018 6:06 AM

झी टीव्हीवर आप के आ जानेसे ही नवी मालिका सुरु होते आहे. या मालिकेत  भूमिकेत असून वेदिका माथूरची भूमिका ...

झी टीव्हीवर आप के आ जानेसे ही नवी मालिका सुरु होते आहे. या मालिकेत  भूमिकेत असून वेदिका माथूरची भूमिका सुहासी धामी आणि साहिल अगरवालची भूमिका करण जोटवाणी साकारणार आहे. आपल्या भूमिकेविषयी सांगताना अभिनेत्री सुहासी धामी म्हणाली, “एवढ्‌या प्रदीर्घ कालावधीनंतर झी टीव्हीवर परत येताना खूप छान वाटतंय. ‘आप के आ जाने से’ ह्या मालिकेची संकल्पना अतिशय खास असून यातून खूप बळकट संदेश अगदी सहजसोप्या पद्धतीने दिला जातो. वेदिका ही एक स्वतंत्र स्त्री असून तिला स्वतःची अशी विचारशक्ती आहे. एक सिंगल पालक असलेल्या वेदिकाचे तिची मुलगी आणि तिच्यासोबत राहणारी तिची आई हेच विश्व आहे. वेदिकाच्या व्यक्तिमत्त्वाला असलेले अनेक स्तर मला एक अभिनेत्री म्हणून माझी क्षमता तपासून पाहण्याची आणि आणखी विकसित होण्याची संधी देतात. ह्याशिवाय ही भूमिका मी आधी साकारलेल्या व्यक्तिरेखांपेक्षा अगदी वेगळी असल्यामुळे मी खूप उत्साहात आहे. मला आशा आहे की प्रेक्षकांना माझ्या व्यक्तिमत्त्वाची ही बाजूसुद्धा आवडेल.”अभिनेता करण जोटवानी म्हणाला, “ ‘आप के आ जाने से’ सारख्या प्रगतीशील मालिकेचा हिस्सा बनताना खूप छान वाटतंय. ही मालिका प्रेमाबद्दल सध्या अस्तित्वात असलेल्या मानसिकतेबद्दल प्रश्न उपस्थित करते. साहिलची भूमिका माझ्या हृदयाच्या अगदी जवळ आहे. तो खुशालचेंडू, उत्साही आणि आपल्या भावना व्यक्त करणारा असा असून बाहेरच्या घटकांचा त्याच्यावर अजिबात परिणाम होत नाही. वेदिका आणि त्याच्यामधील वयाचे अंतर तो आपल्या मार्गातील अडथळा अजिबात बनू देत नाही, उलट परिेस्थितीतून सहजपणे मार्ग काढत तिलाही आपले भविष्य एकत्रपणे बनवण्याची हिंमत तो प्रदान करतो. ह्याशिवाय, रोमहर्षक अनुभवासाठी मी उत्सुक असून मला आशा आहे की प्रेक्षक मला ह्या नवीन रूपात स्वीकारतील.”  मालिकेचे कथानक जसजसे पुढे सरकेल, तसतसे प्रेक्षकांपढे विविध टप्प्यांवर प्रेम आणि सहजीवनाबद्दल विलक्षण प्रश्न उभे केले जातील. त्यात ‘बेहिसाब मोहब्बत क्या समझेगी उम्र का हिसाब?’ यासारख्या रंजक प्रश्नांचा समावेश असेल. वयांतील फरकासारख्या तार्किक गोष्टींपुढे हे अमर्याद प्रेम मान तुकवील? की सामाजिक कलंकाची संभाव्य टीका वेदिका-साहिलना एक प्रेमीयुगुल म्हणून एकमेकांच्या अधिकच निकट आणील? हे आपल्याला लवकरच कळेल.