Join us

भूमिकेच्या मागणीसाठी आक्रती शर्मा शिकली ही गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 20:30 IST

पहिल्या दिवसापासून छोटी कुल्फी आपल्या खऱ्या वडिलांच्या शोधात आहे आणि आता असं दिसतंय की तिची प्रतीक्षा संपत आली आहे.

स्टारप्लसवरील कुल्फी कुमार बाजेवालामधील सर्वांत मोठे सत्य उघडकीस येण्याची वेळ झाली आहे. ह्या शो च्या अगदी पहिल्या दिवसापासून छोटी कुल्फी आपल्या खऱ्या वडिलांच्या शोधात आहे आणि आता असं दिसतंय की तिची प्रतीक्षा संपत आली आहे. ही मोठी बातमी उघड करण्यासाठी टीमने एका खास गाण्यासाठी आक्रिती शर्माला कुल्फी तिचा आवाज देण्याची विनंती केली आहे.

अगदी सुरूवातीपासून बालगायिका राशी कुल्फीसाठी या शोमध्ये पार्श्वगायन करत असून आता या शोमध्ये अखेर कुल्फीला सिकंदरच तिचे खरे बाबा असल्याचे कळणार आहे, त्यामुळे ती खूप आनंदात आहे. त्यामुळे या शोच्या क्रिएटिव्ह टीमने शोमध्ये एक रोचक वळण आणायचे ठरवले असून आपल्या कुल्फी ह्या भूमिकेसाठी आक्रिती स्वतःचं गाणार आहे. ती गेले २ महिने गाण्याचे प्रशिक्षणही घेत आहे.

आकृती शर्मा ही सात वर्षांची चिमुरडी दररोज सकाळी सात वाजता सेटवर आठ तासांच्या चित्रीकरणासाठी हजर असते आणि तिच्या चेहऱ्यावर लाघवी हास्य कायम असते. मात्र तिच्या डोक्यात परीक्षेचे वेळापत्रक आणि अभ्यासाचे विषय यांचा ताण असतो. मात्र ती प्रत्येक प्रसंग नेहमीप्रमाणेच मनमोकळ्या पद्धतीने साकारत असते. आकृती शर्मा ही उत्कृष्ट अभिनेत्रीच आहे, असे नव्हे, तर ती कठोर परिश्रम घेणारी विद्यार्थिनीही आहे. चित्रीकरणाच्या ब्रेकमध्ये तिच्या हातात अभ्यासाचे पुस्तक असते.

टॅग्स :कुल्फी कुमार बाजेवाला