Join us

"नाटक संपल्यावर त्यांनी..."; मराठी कलाकाराचा अभिनय पाहून आमिर खान भारावला; सांगितला खास अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 17:03 IST

'रनअवे ब्राईड्स' या नाटकामध्ये जुनैद खान काम करत आहे. जुनैदच्या या नाटकात मराठी अभिनेता शुभंकर एकबोटेदेखील आहे. आमिरने नुकतंच लेकाचं हे नाटक पाहण्यासाठी हजेरी लावली होती. 

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान लोकप्रिय अभिनेता आहे. आमिरच्या पावलावर पाऊल ठेवतच त्याचा लेक जुनैद खानही अभिनय क्षेत्रात उतरला आहे. जुनैदने महाराज या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. सध्या तो 'रनअवे ब्राईड्स' या नाटकामध्ये काम करत आहे. जुनैदच्या या नाटकात मराठी अभिनेता शुभंकर एकबोटेदेखील आहे. आमिरने नुकतंच लेकाचं हे नाटक पाहण्यासाठी हजेरी लावली होती. 

'रनअवे ब्राईड्स' या नाटकाचा प्रयोग नुकताच जुहू येथील पृथ्वी थिएटरमध्ये पार पडला. या प्रयोगाला आमिर खान उपस्थित होता. प्रयोग संपल्यानंतर आमिरने नाटकातील कलाकारांची भेट घेतली. त्याचा अनुभव अभिनेता शुभंकर एकबोटेने शेअर केला आहे. शुभंकरने आमिरसोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने पोस्ट लिहिली आहे. 

क़ाबिल बनो क़ाबिल...कामयाबी झक मारके पीछे आएगी

No words to express my happiness & gratitude for these moments!

माझा जन्म 1994 चा आणि मला माझ्या आई-बाबांनी अगदी लहानपणापासून मोठ्या पडद्यावर theatre मध्ये जाऊन बरेच हिंदी मराठी चित्रपट दाखवले.. कदाचित आज मी ह्या क्षेत्रात असण्यामागे काही महत्वाच्या कारणांपैकी तेच एक कारण असावं .. लहानपणीच्या काही आठवणी एकदम strong images बनून आपल्या मनात कायम घर करून राहतात ... 75mm च्या मोठ्या पडद्यावर अगदी पहिला चित्रपट जो मला दाखवला गेला तो होता ‘रंगीला’.. रंगीला मधला मुन्ना ते लालसिंग चड्ढा मधला लालसिंग हा संपूर्ण प्रवास बघत मी लहानाचा मोठा झालो .. ह्या प्रवासात प्रत्येक टप्प्यावर ह्या Mr.Perfectionist ने त्याच्या प्रत्येक भूमिकेतल्या रंगीबेरंगी छटांनी माझ्या मनाला भुरळ घातली मला त्याच्या कामाच्या प्रेमात पडायला लावलं ..खरं सांगतो जेव्हा त्यांना मी त्यांच्या seat वर जाऊन बसताना बघितलं तेव्हा काही क्षण काहीच सुधरलं नाही..

मनात एकाच वेळी त्याने साकारलेली प्रत्येक iconic भूमिका दिसायला लागली आणि त्यांची खास गाजलेली वाक्य घुमायला लागली ..! स्वतःला एकवटून सांगितलं कि आपल्याला फक्त आपलं काम मनापासून जीव ओतून करत राहायचं आहे समोर कोणीही असो ... कदाचित हेच त्याने स्वतःला सांगितलं म्हणून आज तो Mr.Perfectionist आहे !

ज्या माणसाला आजपर्यंत आपण मोठ्या पडद्यावर बघितलं तो स्वतः प्रेक्षकांत बसून शांतपणे माझं काम बघतोय आमचं नाटक enjoy करतोय आणि नाटक संपल्यावर आमच्या संपूर्ण team चं कौतुक करतोय .. प्रत्येकाला जातीने आवर्जून त्याच्या तिच्या कामाची दाद देतोय हे बघून इतकंच जाणवलं कि यशाने कितीही मोठी उंची गाठली तरी तुमची मुळं जर मजबूत असतील तर प्रत्येक जण Perfectionist होऊ शकतो...

शुभंकर हा दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचा मुलगा आहे. त्याने अनेक मालिका, नाटक आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. 'धर्मवीर', 'चौक', 'सरसेनापती हंबीरराव' या सिनेमांमध्ये तो झळकला आहे. तर विकी कौशलच्या छावा या सिनेमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :आमिर खानसेलिब्रिटीमराठी अभिनेता