Join us

टीव्ही अभिनेत्याचा पोलिसांवर ‘थर्ड डिग्री टॉर्चर’चा आरोप, वाचा काय आहे प्रकरण!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2019 10:34 AM

‘कसम तेरे प्यार की’ या मालिकेचा अभिनेता अंश अरोराने गाझियाबाद पोलिसांवर थर्ड डिग्री टॉर्चर केल्याचा आरोप लावला आहे. यामुळे अंशला आयसीयूत भरती व्हावे लागले.

ठळक मुद्देहे संपूर्ण प्रकरण ११ मे रात्रीचे आहे. अंशचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

‘कसम तेरे प्यार की’ या मालिकेचा अभिनेता अंश अरोराने गाझियाबाद पोलिसांवर थर्ड डिग्री टॉर्चर केल्याचा आरोप लावला आहे. यामुळे अंशला आयसीयूत भरती व्हावे लागले. याप्रकरणी अंशने मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. सध्या अंशवर गाझियाबादच्या एका रूग्णालयात उपचार सुरु आहेत.

हे संपूर्ण प्रकरण ११ मे रात्रीचे आहे. अंशचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात तो गाझियाबादच्या एका स्टोरमध्ये तोडफोड करताना दिसत आहे.

 

काय आहे प्रकरणअंशने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, ११ मे रोजी मी गाझियाबादेतील एका स्टोरमध्ये खाण्याची आॅर्डर दिली. आॅर्डरसाठी मला तासभर प्रतीक्षा करावी लागली. यानंतर मी ही आॅर्डर कॅन्सल केली. यामुळे स्टोरच्या स्टाफने माझ्याशी गैरवर्तन केले. यामुळे मी संतापलो आणि स्टोरमधील काही सामानांची तोडफोड केली. पण याचदरम्यान मला माझ्या चुकीची जाणीव झाली आणि १२ मे रोजी मी स्टोरमध्ये माफी मागण्यासाठी गेलो. पण स्टोरच्या मालकांनी मला पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी माझ्याविरोधात गुन्हा दाखल केला आणि मला गुन्हेगारासारखी मारहाण केली. पोलिसांनी माझा फोन काढून घेतला. मी घरी न पोहोचल्यामुळे माझे कुटुंब मी बेपत्ता असल्याची तक्रार घेऊन पोलिस ठाण्यात पोहोचले. तेव्हा कुठे त्यांना या घटनेबद्दल कळले. पोलिसांच्या मारहाणीमुळे माझ्या छातीत दुखू लागले. माझा रक्तदाब अचानक वाढला. यामुळे मला रूग्णालयात दाखल करण्यात आले.

अंशने रुग्णालयातील फोटोही शेअर केला. याशिवाय त्याने मानवाधिकार आयोगाला पत्रही लिहिले आहे. अंशने आपल्या पत्रात लिहिले की, जेव्हा आम्ही पोलीस ठाण्यात पोहोचलो तेव्हा तेथे पाच ते सहा पोलीस आले. त्यांनी मला आणि माझ्या भावाला दांड्याच्या सहाय्याने मारण्यास सुरूवात केली. याशिवाय आमच्या घरच्यांना शिवीगाळही केली. दरम्यान गाझियाबाद पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

टॅग्स :अंश अरोरा