बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये एकापेक्षा एक टास्क रंगताना दिसत आहेत. बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये स्पर्धकांमध्ये झालेल्या भांडण, मारामारीने आता कळस गाठलेला दिसतोय. याचा अनुभव नुकताच आला. काल कॅप्टनसी टास्क दरम्यान आर्या आणि निक्कीमध्ये तुफान राडा झालेला दिसला. इतकंच नव्हे तर आर्याने निक्कीला कानफडात लगावताना दिसली. त्यामुळे घरातलं वातावरण चांगलंच तापलेलं दिसलं. आज बिग बॉस आर्याला शिक्षा सुनावणार आहे.
बिग बॉस आर्याला सुनावणार कठोर शिक्षा
बिग बॉस मराठीमध्ये कालचा एपिसोड संपताना आपण पाहिलं की, कॅप्टनसी टास्कमध्ये सुरुवातीला निक्कीला रोखण्यासाठी आर्याने बाथरुमचा दरवाजा अडवून ठेवला होता. पुढे दोघींमध्ये झटापट झाली आणि आर्याने निक्कीच्या कानफडात लगावली. यामुळे अरबाज, वैभव, जान्हवी आणि सर्वांनीच आर्याला दोष दिला. नुकताच बिग बॉसचा नवीन प्रोमो रिलीज झालाय. यामध्ये घरातील मूलभुत नियमांचं उल्लंघन केल्याने बिग बॉस आर्याला मोठी शिक्षा देणार आहेत. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसलेला दिसतोय.
बिग बॉस आर्याला देणार मोठी शिक्षा
बिग बॉसच्या नवीन प्रोमोमध्ये पाहायला मिळतं की, घरातले सर्वजण लिव्हिंग एरियात बसलेले दिसतात. आर्या आणि निक्की मागे उभ्या असतात. अरबाज निक्कीला सावरताना दिसतो. बिग बॉस म्हणतात, "काल बिग बॉसच्या घरात आर्या यांच्याकडून निंदनीय कृत्य घडलं आहे. त्यासाठी बिग बॉस आर्या यांना मोठी शिक्षा सुनावत आहेत." हे ऐकताच आर्या डोक्यावर हात मारताना दिसते. पॅडी आणि अंकितालाही मोठा धक्का बसतो. बिग बॉस आर्याला काय शिक्षा सुनावणार, हे आजच्या भागात पाहायला मिळेल.