MC Stan Abdu Rozik Fight: ‘बिग बॉस १६’मध्ये शिव मंडलीची प्रचंड चर्चा झाली. या मंडलीतील एमसी स्टॅन (MC Stan) हाच सीझनचा विजेताही झाला. साजिद खान, शिव ठाकरे, एमसी स्टॅन, सुम्बुल, निम्रत कौर व अब्दू रोझिक असे सगळे या मंडलीचा भाग होते. ही मंडली आणि त्यांची मैत्री जाम चर्चेत राहिली. पण शो संपला तसा आता या मंडलीत फूट पडल्याची चर्चा आहे. होय, अब्दू रोझिकने (Abdu Rozik) याला दुजोरा दिला आहे. आता मंडली संपली, सगळं संपलं, असं अब्दू म्हणाला. नेमकं झालं काय? तर मुळात अब्दू व एमसी स्टॅन यांच्यात बिनसलं आहे. आता स्टॅन अब्दूचा साधा फोनही उचलत नाहीये. स्वतः अब्दुनेच त्याच्या एका व्हिडीओमध्ये खुलासा केला आहे.काही रिपोर्टनुसार, एमसी व अब्दू दोघांमध्ये एका गाण्यावरून मतभेद झाले आहेत. असं म्हणतात की, दोघं एकत्र एक गाणं रेकॉर्ड करणार होते. तसं काहीही घडलं नाही. यामुळे अब्दू स्टॅनवर नाराज आहे. याचदरम्यान आता अब्दूने एक व्हिडीओ शेअर केला आहे.
अब्दू म्हणाला...व्हिडीओमध्ये अब्दू म्हणतो, माझ्या गाण्याला २३ मिलियन व्ह्यूज मिळाले. त्यामुळे गाण्याचे प्रमोशनसाठी मला एमसी स्टॅनची गरज नाही. जेव्हा मी एमसी स्टॅनला कॉल करतो तेव्हा तो हाय किंवा सलाम न म्हणता थेट कॉल डिस्कनेक्ट करतो. प्रत्येकजण येऊन मला एमसी स्टॅनबद्दल विचारतो. त्याच्याबद्दल मी कधी वाईट बोलेन असं तुम्हाला वाटतं का? बिग बॉसच्या घरात तो दु:खी असायचा, तेव्हा मी त्याच्याबरोबर होतो. आता तो मीडियात सांगत फिरतोय की मी त्याला माझ्या गाण्याचं प्रमोशन करायला सांगितलं. माझ्या गाण्याच्या प्रमोशनसाठी मला त्याची गरज काय? तो असं का करतोय, मला माहित नाही. मला त्याचा मनस्ताप होत आहे. मीडियामध्ये बातम्या पाहिल्यापासून माझं माथं ठणकू लागलं आहे.”
शनिवारी रात्री शिव ठाकरेने एक पार्टी आयोजित करत मंडलीत सगळं काही ठीक असल्याचं दर्शवण्याचा प्रयत्न केला. या पार्टीमध्ये साजिद खान, सुंबुल, अब्दू रोझिक, प्रतिक सहजपाल, सौंदर्या शर्मा, शिल्पा शिंदे, विशाल कोटियन हजर होते.