कधी कधी अभिनेते आपल्या पडद्यावरील भूमिकेशी इतके एकरूप होऊन जातात की त्यांचा खरा स्वभाव देखील त्यामुळे प्रभावित होतो. दररोज 12-13 शूट केल्यानंतर हे स्वाभाविक आहे की, तो पडद्यावर साकारत असलेल्या व्यक्तिरेखेच्या छटा त्याच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वात देखील दिसू लागतात. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनच्या एका मालिकेच्या सेटवर अलीकडे अशीच एक घटना घडली. साई बाबा मालिकेत मध्यवर्ती भूमिका करणार्या अबीर सूफीला एका दृश्यात राग व्यक्त करायचं होता त्यावेळी त्याला एक छोटीशी अडचण आली.
साई बाबा हे शांतीचे आणि क्षमेचे मूर्तीमंत स्वरूप होते, ही गोष्ट साईंच्या सर्व अनुयायांना आणि भक्तांना ज्ञात आहे. अबीरने देखील हा कसून प्रयत्न केला आहे की, टेलिव्हिजनवर साई साकारताना त्यांचे शांत आणि धीरगंभीर व्यक्तिमत्व दिसेल. श्री साई बाबा एक संत होते आणि ते सगळ्यांना प्रेम आणि करुणेचा संदेश द्यायचे. साई त्यांच्या भक्तांवर चिडले आहेत व त्यांना रागावले आहेत असे प्रसंग अगदी विरळ आहेत. अशाच एका प्रसंगाचे चित्रण करताना पडद्यावर शांत व धीरगंभीर साई साकारण्याची सवय झालेल्या अबीर सूफीला ते थोडे जड गेले. अबीरला विचारले असता त्याने सांगितले, “मी पहिल्यापासून शांतच आहे आणि क्वचितच कुणावर संतापतो किंवा नाराज होतो. साईंचा अनुयायी झाल्यानंतर ह्या शांतपणात भरच पडली आहे. माझ्या भूमिकेस अनुसरून, मी या संताचा शांत आणि गंभीर स्वभाव पडद्यावर साकारणे अपेक्षित आहे. त्यांचे लाखो भक्त आपल्या विविध प्रश्नांवर त्यांचा सल्ला घेतात आणि साई त्या प्रत्येकाला प्रेमाने उत्तर देतात. कधी तरी असे घडले आहे की त्यांनी त्यांचा राग व्यक्त केला आहे आणि मालिकेत सध्या तसाच प्रसंग सुरू असल्यामुळे मी देखील राग व्यक्त करणे आवश्यक होते. पण मला तसे करताना थोडा त्रास झाला कारण मला त्यांचे प्रेमळ आणि स्मित करणारे रूप साकारण्याची सवय झाली आहे. हा सीन व्यवस्थित देणे हे माझ्यासाठी एक आव्हानच होते. दिग्दर्शक संतुष्ट होईपर्यन्त मला बर्याच वेळा तो शॉट द्यावा लागला. माझ्यासाठी हा एक वेगळाच अनुभव होता.”