छोट्या पडद्यावर सुपरहिट ठरलेली मालिका म्हटलं तर चटकन डोळ्यासमोर नाव येतं ते आभाळामायाचं . मालिकेचे कथानक जितंक रसिकांच्या पसंतीस पात्र ठरलं तितकेच कलाकारांच्या भूमिकांनाही रसिकांनी डोक्यावर घेतलं होतं. मालिकेत सुकन्या मोने यांनी सुधाची भूमिका साकारली होती तर मनोज जोशी यांनी शरद ची भूमिका साकारली होती. इतकंच काय तर 'आभाळमाया'चं टायटल साँग आजही कित्येक रसिकांच्या मनात रुंजी घालतंय. आभाळमाया मालिकेलाही आता २० वर्षही झाली आहेत. आजही मालिकेच्या आठवणी रसिकांच्या मनात घर करुन आहेत.
सुधा आणि शरद यांना आकांक्षा आणि अनुष्का या दोन दाखवण्यात आल्या होत्या. आकांक्षाची भूमिका अभिनेत्री परी तेलंगने साकारली होती तर अनुष्काची भूमिका ऋचा पाटकर हिने साकारली होती. मालिकेतील काही कलाकार आजही वेगवेगळ्या मालिका सिनमाच्या माध्यमातून रसिकांचे मनोरंजन करत आहेत. पण अनुष्का भूमिका साकारलेली ऋचा पाटकर मात्र या मालिकेनंतर कुठेच झळकली नाही. याच मालिकेमुळे ऋचाला नवी ओळख आणि लोकप्रियता लाभली होती. आता ऋचा कशी दिसते काय करते असे प्रश्न तुम्हाला पडले असतील. ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ख-या आयुष्यातही ती खूप सुंदर दिसते.
मुंबईतच लहानाची मोठी झालेल्या ऋचाने केसी कॉलेजमधून तिचे शिक्षण पूर्ण केले. २०१३ साली आदित्य नागवेकरसह लग्न करुन संसारात रमली. ऋचाला अभिनयापेक्षा डान्सची आवड आहे. तसेच तिला वेगवेगळ्या ठिकाणांनाही भेटी द्यायला आवडते. तिथली संस्कृती जाणून घेण्यात तिला प्रचंड रस आहे. तसेच वेगवेगळे पदार्थ बनवण्याची तिाल खास आवड आहे. सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे पदार्थ बनवत त्यांचे फोटोही ती शेअर करताना दिसते.