बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कोण कधी कोणाच्या बाजूने बोलेल, पाठ फिरतच कोण वार करेल, कोणता सध्या कोणाला भडकवायचा प्रयत्न करेल हे कळणे अवघड असते. अभिजीत बिचुकलेसुरेखा पुणेकर यांना घरामध्ये त्यांची आई मानतात त्या आईची जागी आहेत असे त्यांनी बऱ्याचदा बोलून दाखविले आहे. मागील आठवड्यामध्ये झालेल्या विकेंडचा डावमध्ये सुरेखा ताईंनी अभिजीत बिचुकले यांची शाळा घेतली. ते कुठे चुकत आहेत, शिवीगाळ करतात यावर त्यांनी आक्षेप घेतला आणि त्यांना खडसावले. आज नेहाला अभिजीत बिचुकले सुरेखा पुणेकरांबद्दल काही गोष्टी सांगणार आहेत.
बिचुकलेंचे म्हणणे आहे,“सुरेखा ताईना मी पहिल्यापासून ओळखतो. त्या वेगळ्याच मानसिकतेमध्ये आहेत. आपला शो फ्लॉप करण्याच त्यांच्या डोक्यामध्ये आहे. त्या माझ्यासमोर बोलल्या ते किंवा त्या मला उकसवत होत्या, आणि कि यावर माझ्याकडून अलसे काही विधान घेईल जे विधानं त्यांना ट्वीस्ट करता येईल, असा माझा अंदाज आहे.
तसेच काल झालेल्या प्रकारावरून रुपालीने माफी मागितली आणि मी देखील माफी मागितली आणि हे होत असताना त्या तिथे होत्या आणि त्या म्हणाल्या ही पहिल्यापासून मला नको होती आणि नको आहे”. आता यावर नेहाचे काय म्हणणे पडले कोण नको आहे त्यावर बिचुकले म्हणाले तू नको आहेस त्यांना... आता नेहा यावर विश्वास ठेवेल ? काय होईल पुढे ? हे आपल्याला आज कळले.