Join us  

अभिजीत बिचुकले बिग बॉसच्या घरात, संतापून म्हणाले, 'काहीही फो़डू शकतो...'; अंकिताची दाखवली 'ही' चूक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 11:17 AM

Bigg Boss Marathi Season 5 Contestants: अभिजीत बिचुकले यांनी घरात येताच एकेकाला धारेवर धरलं आहे.

Bigg Boss Marathi Season 5: बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा लवकरच शेवट होणार आहे. सीझनच्या ग्रँड फिनालेला केवळ ८ दिवस राहिलेत. सीझन शेवटाकडे जात असतानाच आता घरात अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale)  आणि राखी सावंत यांची एन्ट्री झाली आहे. दोघंही घरातल्यांना त्यांच्या चुका दाखवण्यासाठी आले आहेत. अभिजीत बिचुकले यांनी घरात येताच एकेकाला धारेवर धरलं आहे. तसंच अंकिताची सूरजबाबतीत झालेली चूकही त्यांनी दाखवून दिली आहे. 

कलर्स मराठीने बिग बॉसचा नवीन प्रोमो शेअर केला आहे. आजच्या एपिसोडमध्ये राखी सावंत आणि अभिजीत बिचुकले एकत्र घरात येणार आहेत. दरम्यान अभिजीत बिचुकले घरात येताच संतापलेले आहेत. अंकिताला म्हणाले, "सूरजच्या चेहऱ्यावर तू लाल क्रॉस करत त्याला टार्गेट केलंस. बहीण असं कधीच करत नाही." नंतर ते म्हणतात, ' तुमचा कुचकेपणा दिसला. इतका राग येतोय मला मी काहीही फोडू शकतो या घरात.'

अभिजीत बिचुकले हे बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात सहभागी झाले होते. अनेकदा ते आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता घरातील सदस्यांचा ते कसा पाणउतारा करतात हे आज दिसणार आहे. बिचुकलेंना घरात पाहून सदस्यांचेही चेहरे कावरेबावरे झालेत. तर प्रोमोवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. 'भाऊ तुमचीच कमी होती, या स्वागत आहे तुमचं','आता कोणाला सुट्टी नाही','सगळ्यांची इच्छा पूर्ण झाली आज'  असं म्हणत नेटकऱ्यांनी चेष्टा केली आहे. 

बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले ६ ऑक्टोबर रोजी होणार आहे. सध्या घरात वर्षा, पंढरीनाथ, अभिजीत, निक्की, धनंजय, अंकिता, सूरज आणि जान्हवी हे आठ सदस्य राहिले आहेत. हे सर्वच या आठवड्यात नॉमिनेट झाले आहेत.

टॅग्स :अभिजीत बिचुकलेबिग बॉस मराठीकलर्स मराठी