Join us

CM शिंदेंच्या गणपती उत्सवात मोठमोठ्याने आरती म्हणताना दिसला अभिजीत खांडकेकर, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2024 13:10 IST

दरवर्षी मुख्यमंत्र्याच्या वर्षा बंगल्यावरही गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात पार पडतो. यंदाही मोठ्या जल्लोषात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गणेशोत्सव साजरा केला. यंदाही सेलिब्रिटींनी वर्षा बंगल्यावर गणेशोत्सवासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं.

संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात गणेशोत्सव पार पडला. घरोघरी गणरायाचं आगमन झाल्यानंतर आता १० दिवसांनी सर्वांचे लाडके बाप्पा निरोप घेतआहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने पार पडला. सेलिब्रिटींच्या घरीही बाप्पा विराजमान झाले होते. दरवर्षी मुख्यमंत्र्याच्या वर्षा बंगल्यावरही गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात पार पडतो. यंदाही मोठ्या जल्लोषात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गणेशोत्सव साजरा केला. 

दरवर्षीप्रमाणे यंदाही सेलिब्रिटींनी वर्षा बंगल्यावर गणेशोत्सवासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं. बॉलिवूड तसेच मराठी सेलिब्रिटींनी वर्षा बंगल्यावर उपस्थित राहत गणरायाचं दर्शन घेतलं. वर्षा बंगल्यावरील गणेशोत्सवाचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. या व्हिडिओमध्ये मराठी कलाकार गणपती आरतीचा आनंद घेताना दिसत आहेत. मराठी स्क्रीन या इन्स्टाग्राम चॅनेलवरुन वर्षा बंगल्यावरील आरतीचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत मराठी कलाकारांचा आरतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. तर अभिनेता अभिजीत खांडकेकर जोरजोरात घालीन लोटांगण म्हणताना दिसत आहे. 

अभिजीत खांडकेकरबरोबर त्याची पत्नी सुखदादेखील वर्षा बंगल्यावर गणपती दर्शनासाठी गेली होती. वर्षा बंगल्यावरील गणेशोत्सवाचे फोटो सुखदाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत सुखदाने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.  

टॅग्स :गणेशोत्सव 2024एकनाथ शिंदेसेलिब्रिटी गणेशअभिजीत खांडकेकर