Join us

अभिजीत केळकरला येतेय बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडलेल्या या सदस्याची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 18:18 IST

बिग बॉस मराठीच्या घरातून एक सदस्य बाहेर गेल्याचा चांगलाच धक्का अभिजीतला बसला आहे.

ठळक मुद्देसुरेखा ताई बाहेर गेल्‍यामुळे मी थोडा सायकोलॉजीकली डाऊन झालो आहे. तसेच डिस्‍टर्ब झालो आहे. मोठा माणूस असला की एक आधार असतो ना... की काही झालं घरात तर आहेत ते असे आपण मनाला समजवतो!

'बिग बॉस मराठी २' या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत असून या घरातील सगळेच स्पर्धक आता प्रेक्षकांचे प्रचंड आवडते बनले आहेत. सध्या घरात असलेल्या स्पर्धकांपैकी कोण स्पर्धक विजेता ठरणार याचा प्रत्येकजण अंदाज लावत आहे. 

बिग बॉस घरातील आपली लाडकी लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर बाहेर पडल्‍याने अनेक स्‍पर्धकांना धक्‍का बसला आहे आणि सर्व स्‍पर्धकांना त्‍यांची खूप आठवण येत आहे. यापैकीच एक आहे अभिजीत केळकर... जो त्‍यांच्‍या एलिमिनेशची बातमी ऐकताच खूपच दु:खी झाला होता. वूटच्‍या 'अनसीन अनदेखा' मधील नवीन क्लिपमध्‍ये भावूक झालेला अभिजीत सुरेखा ताईंबाबत बोलताना आणि स्‍वत:च्‍या जीवनातील अनुभव सांगताना दिसत आहे. 

अभिजीत सांगतो, ''सुरेखा ताई बाहेर गेल्‍यामुळे मी थोडा सायकोलॉजीकली डाऊन झालो आहे. तसेच डिस्‍टर्ब झालो आहे. मोठा माणूस असला की एक आधार असतो ना... की काही झालं घरात तर आहेत ते असे आपण मनाला समजवतो!'' रूपाली देखील अभिजीतच्या बोलण्याला दुजोरा देत म्‍हणते की, बाप्‍पा आणि सुरेखाताईंच्‍या बाहेर जाण्‍याने बिग बॉस मराठीच्या घरामध्‍ये अनेक बदल झाले आहेत. 

अभिजीतला सुरेखा पुणेकर यांना पाहून सतत एका व्यक्तीची आठवण यायची असे देखील त्याने सांगितले. सुरेखा ताईंसोबत बिग बॉस मराठीच्या घरात राहाताना त्‍याच्‍या बालपणीच्‍या केअरटेकरची आठवण येत असे. त्यांच्यासोबत सुरेखा ताईंची तुलना करत तो म्‍हणतो, ''मी ज्‍यांच्‍याकडे लहानाचा मोठा झालो ना त्‍या एक्‍झॅक्‍ट सुरेखा ताई यांच्यासारख्‍याच आहेत. मी फार बोललो नाही कधी त्‍यांच्‍याविषयी... पण अटॅचमेंट होती मला. आई बाबा जॉबला जायचे, त्‍यांच्‍याकडेच असायचो आम्‍ही. माझ्यासाठी त्‍यांनी खूप केलं आहे... मी कोणाचा मुलगा आहे हे चाळीतल्‍या लोकांना देखील कळायचं नाही. माझी हौस, मौज सगळे काही ते पुरवायचे. मला काय हवं असेल ते लगेचच मला आणून द्यायच्या.'' 

तो पुढे सांगतो, ''या सगळ्या गोष्‍टी सुरेखाताईंशी बोललो नाही... पण मी त्यांच्याशी खूप अटॅच्‍ड होतो!'' 

टॅग्स :अभिजीत केळकरसुरेखा पुणेकरबिग बॉस मराठी