Join us

हे स्त्रीचे कपडे, हे पुरूषांचे कपडे अशा मानसिकतेला आता ‘राम राम’ करूया, अभिजित खांडकेकरची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 3:11 PM

या फोटोच्या माध्यमातून पारंपरिक वस्त्रांचा वापर करण्याचाही संदेश त्याने चाहत्यांना दिला आहे. नुसता संदेशच दिला असे नाही तर याची सुरुवात त्याने स्वतःपासून केली आहे.

आजही पुरुष आणि स्त्री यांच्यामध्ये भेदभाव काही अंशी तरी पाहायला मिळते.अगदी कपड्यांची निवड करताना देखील स्त्री -पुरुष अशी कॅटेगरी आपण पाहतो. आता या मानसिकेतूनही बाहेर पडण्याची गरज आहे म्हणत अभिजित खांडकेकरने एक फोटो शेअर केला आहे. त्याचा हा फोटो खूप खास आहे. कारण एका फोटोतून त्याने लाखमोलाचा संदेश दिला आहे. या फोटोच्या माध्यमातून पारंपरिक वस्त्रांचा वापर करण्याचाही संदेश त्याने चाहत्यांना दिला आहे.

नुसता संदेशच दिला असे नाही तर याची सुरुवात त्याने स्वतःपासून केली आहे. अभिजितने स्वतः ‘हिमरू’ वीण असलेली रेशमी साडी धोतर म्हणून नेसले आहे.  रेशमी साडी, धोतर म्हणून तेवढीच सुरेख दिसते अशी कॅप्शनही त्याने या फोटोला दिले आहे. इतकेच नाही तर आपल्या कपड्यांच्या कपाटात आता पारंपरिक वस्त्रांचाही समावेश करुया असेही म्हटले आहे. सध्या अभिजितच्या या पोस्टचे प्रचंड कौतुक होत आहे. 

अभिजीत आणि सुखदा एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असतात आणि त्यांच्या फोटोना चाहत्यांनी पसंतीदेखील मिळते.अनेकदा अभिजित पत्नी सुखदासोबत ट्रेडिशनल अंदाजात दिसतो. नुकतेच त्याने सुखदासोबत काही रोमँटीक फोटो शेअर केले होते.

 

अभिजीतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पत्नी आणि अभिनेत्री सुखदासोबतचा ट्रेडिशनल लूकमधले फोटो पाहून चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्चा वर्षाव केला होता. फोटोमध्ये दोघेही खूप सुंदर दिसत आहेत. अभिजीत आणि सुखदाचा रोमाँटिक अंदाजातील फोटो पाहून त्याचे फन्सही फिदा झालेत. 

छोट्या पडद्यासह अभिजीतनं मोठ्या पडद्यावरही मराठी सिनेमात भूमिका साकारल्या आहेत. 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा', 'ध्यानीमनी', 'भय', 'ढोलताशे' या सिनेमात अभिजीतने भूमिका साकारल्यात.'क्रिमिनल्स... चाहूल गुन्हेगारांची' ही मराठी मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेचे सूत्रसंचालन अभिजीत करणार आहे. दुसरीकडे सुखदा देशपांडे-खांडकेकर ही कथ्थक नृत्यांगणा आहे. 'धरा की कहानी' या हिंदी मालिकेतही तिने काम केले आहे. संजय लीला भन्साली यांच्या गाजलेल्या बाजीराव मस्तानी या सिनेमातही सुखदाने काम केले आहे. 

टॅग्स :अभिजीत खांडकेकरसुखदा खांडकेकर