Join us  

Video : 'बिग बॉस'च्या घरात जाण्याआधी अभिजीत सावंतने 'अशी' केली होती तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 11:02 AM

'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री घेऊन आता अभिजीतला ३० दिवस झाले आहेत. या निमित्ताने अभिजीत सावंतच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय.

Bigg Boss Marathi Season ५ : 'बिग बॉस मराठी'चा यंदाचा सीझन चांगलाच चर्चेत आहेत. पहिल्या दिवसापासून या शोने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 'बिग बॉस'च्या घरातील कल्लाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहे. 'बिग बॉस'च्या घरात सुरांचा बादशहा  अभिजीत सावंत (Abhijeet Sawant) हा जबरदस्त गेम खेळताना पाहायला मिळतोय. सध्या अभिजीतचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 

'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री घेऊन आता अभिजीतला ३० दिवस झाले आहेत. या निमित्ताने अभिजीत सावंतच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहलं, 'बिग बॉसच्या घरात ३० दिवस हे थोडक्यात असे दिसतील. बघताय ना public बिग बॉसच्या घरात राहायची कशी आणि किती practice करावी लागते. पहात राहा Bigg Boss मराठी, दररोज रात्री ९ वाजता, फक्त कलर्स मराठी आणि @officialjiocinema वर'. त्याच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

या व्हिडीओमध्ये बिग बॉसच्या घरात जाण्याआधी अभिजीतने काय-काय तयारी केली होती, हे पाहायला मिळत आहे. 'बिग बॉस'च्या घरात सहभागी होणाऱ्या प्रत्येक सदस्याला भांडी, साफसफाई, स्वयंपाक, अशी सर्व काम करावी लागतात. प्रत्येकाला घरातील कॅप्टन ड्युटी देतो. त्यामुळे घरात गेल्यावर काम करण्यात अडचण येऊ नये, म्हणून ही कामे करण्याची सवय अभिजीतने आधीच स्व:तला लावल्याचं या व्हिडीओमध्ये दिसतंय. 

अभिजीत सावंत हा इंडियन आयडॉल सीझन १ चा विजेता आहे. अभिजीत सावंत हा ४२ वर्षांचा असून त्याने दादरच्या राजा शिवाजी विद्यालयातून शिक्षण घेतलंय. अभिजीतच्या पत्नीचं नाव आहे शिल्पा एडवणकर-सावंत. शिल्पाचा स्वतःचा केकचा व्यवसाय असून अस्मी नावाने हा बिझनेस करते. अभिजीतच्या दोन मुलींचं नाव आहे समीरा आणि आहाना. सूरांची जादू करणारा अभिजीत सावंत 'बिग बॉस मराठी ५'मध्ये काय कल्ला करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

टॅग्स :अभिजीत सावंतबिग बॉसबिग बॉस मराठीसेलिब्रिटी