Join us

"पिशव्या उचलायला नेलं होतं..." बायकोच्या पोस्टवर अभिजित खांडकेकरने केलेली कमेंट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2022 14:08 IST

अभिनेता अभिजित खांडकेकर आणि सुखदा खांडकेकर यांची जोडी मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय जोड्यापैकी एक आहे.

अभिनेता अभिजित खांडकेकर (Abhijeet khandekekar) आणि सुखदा खांडकेकर (Sukhda khandekar) यांची जोडी मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय जोड्यापैकी एक आहे. अभिजित आणि सुखदा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे असून ते या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. दिवाळीची शॉपिंग करतानाचे फोटो सुखदाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

दोघेही नुकतेच दिवाळीच्या खरेदीला गेले होते. तेव्हा त्यांनी खास फोटोसुद्धा शेअर केलेत. तर कॅप्शन देत लिहिलंय, दिवाळीची खरेदी माझ्या जीवलग मित्रासोबत. या पोस्टवर अभिजीतने कमेंट करत लिहिलंय, मला फक्त खरेदीच्या पिशव्या उचलायला नेलं होतं. 

 सोशल मीडियावर सुखदा आणि अभिजीत दोघेही फार सक्रिय असतात. नेहमीच त्यांचे रोमँटीक व्हिडीओस पाहायला मिळतात. काहीच दिवसांपूर्वी ते एका रोमँटीक म्युझीक व्हिडीओत सुद्धा झळकले होते. अभिजीत खांडकेकर याची पत्नी सुखदा खांडकेकर हीदेखील मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अनेक मालिका चित्रपटात तिने काम केले आहे. सुखदा ‘पुण्यश्लोक आहिल्याबाई’ या हिंदी मालिकेत काम करत आहे तर अभिजित खांडकेकर सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच गीत गात आहे’ या मालिकेत काम करतो आहे.  

टॅग्स :अभिजीत खांडकेकरसुखदा खांडकेकर