Join us  

​अभिजीत साटम स्टार प्रवाहाद्वारे मराठी टीव्हीवर करणार कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2017 6:49 AM

सध्याच्या काळात टेलिव्हिजन हे अत्यंत सशक्त माध्यम बनले आहे. या माध्यमात अनेक प्रयोग केले जात आहेत. शहर असो किंवा ...

सध्याच्या काळात टेलिव्हिजन हे अत्यंत सशक्त माध्यम बनले आहे. या माध्यमात अनेक प्रयोग केले जात आहेत. शहर असो किंवा ग्रामीण भाग प्रत्येक ठिकाणच्या घराघरात टिव्ही हा पाहिला जात असल्याने चित्रपटात काम करणारे कलाकार देखील आता टेलिव्हिजनकडे वळले आहेत. अनेक उत्तमोत्तम नाटकांचा निर्माता, अभिनेता, दिग्दर्शक म्हणून ओळख असलेला अभिजीत साटम आता मराठी टेलिव्हिजनवर कमबॅक करत आहे. स्टार प्रवाहवरील नव्या मालिकेत प्रमुख भूमिकेतून तो दिसणार आहे. या नव्या मालिकेविषयी अधिक तपशील लवकरच जाहीर केले जाणार असल्याचे कळतेय. या नव्या मालिकेत अभिजीत मुख्य भूमिकेत असल्याचे म्हटले जात आहे.अभिजीत साटम हा शिवाजी साटम यांचा मुलगा आहे. त्यामुळे त्याला अभिनयाची देणगी आपल्या वडिलांकडूनच मिळाली. आपल्या वडिलांच्या म्हणजेच शिवाजी साटम यांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिजित साटमनेही अभिनयक्षेत्रात अनेक वर्षांपूर्वी पदार्पण केले. त्याने अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तेरा मेरा साथ रहे, प्राण जाये पर शान ना जाये, संशय कल्लोळ अशा अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटातील त्याच्या भूमिकांचे कौतुक झाले होते. तसेच शिवाजी साटम यांची मुख्य भूमिका असलेल्या सीआयडी या मालिकेत त्याने अभिनय केला होता.  अभिजीतने अभिनयाप्रमाणेच दिग्दर्शन आणि निर्मिती देखील केली आहे. हापूस या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शनही त्याने केले होते. त्याशिवाय त्याने निर्मिती केलेली मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, लग्नकल्लोळ, मिस्टर अँड मिसेस, स्ट्रॉबेरी अशी प्रयोगशील नाटके प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. आता तो स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेतून मराठी टेलिव्हिजनवर अभिनेता म्हणून तो कमबॅक करत आहे. त्याची ही इनिंग कशी होते, याकडे लक्ष लागले आहे.अभिजीत कोणत्या मालिकेत झळकणार, तो या मालिकेत कोणत्या भूमिकेत झळकणार याविषयी आपल्याला लवकरच कळेल. या मालिकेची लवकरच अधिकृत घोषणा होणार असल्याचे कळतेय. या मालिकेत अभिजीतसोबत कोण कोण कलाकार मालिकेत झळकणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली आहे. Also Read : सीआयडी टीममधील या सदस्याच्या निधनाने शिवाजी साटम यांना बसला धक्का