Join us

'ये रिश्ता क्या कहलाता है'मध्ये अखेर आमने-सामने आले अभिमन्यु आणि अक्षरा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 17:13 IST

Yeh Rishta Kya Kehlata Hai: ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. पाच वर्षांच्या लीपनंतर कथानक नव्या वळणावर आले आहे.

स्टार प्लसवरीलये रिश्ता क्या कहलाता है (Yeh Rishta Kya Kehlata Hai) या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. या शोमध्ये अक्षरा आणि अभिमन्यू यांच्या प्रमुख भूमिकेत हर्षद चोप्रा आणि प्रणाली राठोड आहेत, ज्यांना चाहत्यांचे खूप प्रेम मिळत आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' च्या प्रेक्षकांनी विविध भावना आणि कथानकाचे रोमांचक ट्विस्ट अनुभवले आहेत. अक्षरा आणि अभिमन्यूची जोडी ही हे शोचे मुख्य आकर्षण आहे. पाच वर्षांच्या लीपनंतर कथानक नव्या वळणावर असून यामध्ये जय सोनी अभिनवच्या भूमिकेत आहे, जिथे तो अक्षराच्या पतीची भूमिका साकारतो आहे.

मालिकेच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या प्रोमोमध्ये, अभिमन्यूला कळते की अक्षराने तिच्या आयुष्याची नव्याने सुरुवात केली आहे आणि ती तिच्या आयुष्यात पुढे निघून गेली आहे. आणि आता अभिमन्यू आणि अक्षरा विभक्त झाल्यानंतरच्या पाच वर्षांनी पुन्हा एकमेकांसमोर येत आहेत. त्यांच्यातील विभक्तपणासोबतच त्यांच्या डोळ्यातून प्रेम, निराशा आणि पुनर्मिलनाची भावना प्रतिबिंबित होताना दिसते.

चाहते आपली आवडती जोडी अभिमन्यु आणि अक्षरा एकत्र येण्याची वाट पहात असून त्यांच्यातील रोमांस पाहण्यासाठी उत्सुक आहेत. 'ये रिश्ता क्या कहलाता है' स्टार प्लसवर सोमवार ते रविवार दर रात्री साडे नऊ वाजता प्रसारित होतो.

टॅग्स :ये रिश्ता क्या कहलाता हैस्टार प्लस