नुकतीच श्वेता तिवारी (Shweta Tiwari) 'खतरों के खिलाडी 11' (khatron ke khiladi season 11) च्या शूटिंगसाठी दक्षिण आफ्रिकेला रवाना झाली आहे. यानंतर पती अभिनव कोहली (Abhinav Kohli)चा असा आरोप आहे की श्वेता आजारी रेयांशला मुंबईतील हॉटेलमध्ये सोडून निघून गेली. यानंतर श्वेता तिवारीने सांगितले की, ती रेयांशला कुटुंबीयांकडे जबाबदारीने सोडून गेली आहे आणि अभिनववर बेजबाबदार वडील असल्याचा आरोप केला. यानंतर अभिनवनेही श्वेतावर पलटवार केला आहे.
अभिनवने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत श्वेता तिवारी जोरादर हल्ला चढवला आहे.अभिनवने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, 'जेव्हा मी अर्जुन बिजलानीसोबत शो करत होतो, ज्यांच्यासोबत तू पण केपटाऊनमध्ये आहेस. मी आणखी दोन बालाजी शो केले आणि अलीकडे माझ्या अकाऊंटमधून तुझ्या अकाऊंटमध्ये 40% रक्कम ट्रान्सफर केली आणि आता तू म्हणतेस मुलांचा सगळा खर्च तू एकटी करते आहेस. तू आधीपासूनच खालच्या पातळीची आहेस आणि आता तू आणखी खालच्या पातळीला उतरली आहेस.