Join us

'अभिषेक देशमुखमध्ये हा 'यश अरुंधती देशमुख' आहेच'; 'आई कुठे काय करते'मधील अनिरुद्धची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 8:58 PM

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte)मधील अनिरुद्ध उर्फ मिलिंद गवळी (Milind Gawali)ची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte)ने कमी कालावधीत रसिकांच्या प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सर्वच पात्र चर्चेत येत असतात. या मालिकेतील य़श म्हणजेच अभिषेक देशमुख(Abhishek Deshmukh)चा दोन दिवसांपूर्वी वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसानिमित्त अनिरूद्धची भूमिका साकारणाऱ्या मिलिंद गवळी (Milind Gawali)ने एक स्पेशल पोस्ट शेअर केली. मिलिंद गवळीची पोस्ट चर्चेत आली आहे.  

मिलिंद गवळीने अभिषेक देशमुखसोबतचे काही फोटो शेअर करत लिहिले की, अभिषेक देशमुख म्हणजेच “आई कुठे काय करते ” या मालिकेतील यश देशमुख, आणि आता “यश अरुंधती देशमुख”. आईचा म्हणजेच अरुंधतीचा आदर करणारा, तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा, सोज्वळ मुलगा, ज्याला म्युझिकमध्ये करिअर करायचं, अनिरुद्ध देशमुखची सतत बोलणी खाणारा, आपल्या बापाच्या विरुद्ध पण तरीही आईची साथ न सोडणारा असा यश, अभिषेक देशमुख मध्ये हा “यश अरुंधती देशमुख “आहेच. पण त्याच्याही पलीकडे अभीमध्ये असंख्य गुण आहेत.”

त्यांनी पुढे लिहिले की, “ज्यांनी आमची सिरीयल दोन वर्ष सतत बघितली त्यांना यश हा चांगलाच माहिती झालेला आहे. लोकांचा लाडका तर तो आहेच, पण आम्हाला यश बरोबर आम्हाला अभिषेक हा पण खूप चांगला माहिती झालेला आहे. अभिषेक पण लाड करण्यासारखाच आहे, तो अतिशय खोडकर, सगळ्यांच्या खोड्या काढल्याशिवाय त्याला चैन पडत नाही, तो सगळ्यांच्याच खोड्या काढतो कोणालाही तो सोडत नाही, सतत त्याच्या डोक्यात मिश्किलपणा असतो आणि त्यामुळे वातावरण हसतखेळत राहत. अभिषेकला शांत बसलेला मी कधीही पाहिलेलं नाही”.

सुपर एनर्जी, सुपर एक्टिव्ह असा यश आहेसुपर एनर्जी, सुपर एक्टिव्ह, क्रिकेट, फुटबॉल खेळायला लागला की तो आपण शूटिंग करतो याचं भानही विसरतो, घामाघूम होतो, सतत त्याला सगळ्या गोष्टींचं कुतूहल असतं, तो कुठल्याही विषयावर बोलू शकतो, कोणाशीही संवाद साधू शकतो, सतत स्वतःला अपडेट करत असतो,तसेच तो सर्वांचे ऐकतोही. फोटोग्राफीची त्याला अतिशय आवड,तो सगळ्यांचे फोटो काढत असतो, त्याला आवडतं,आमच्या सेटवर कोणालाही फोटो काढून घ्यायचे असतील किंवा काही ऑडिशनसाठी व्हिडिओ पाठवायचे असतील तर सगळे अभिषेकच्या हात धुवून मागे लागतात, ते त्याला नाही आवडत, तो त्याच्या मर्जीचा मालक आहे, त्याला वाटेल तेव्हाच तो लोकांचे फोटो काढेल, गेल्या दोन वर्षात अभिषेकने माझे आठ एक फोटो काढले असतील, महिना चार महिन्यानंतर त्याला मूड आला की तो आपला हात धरतो आणि त्याला योग्य वाटेल अशा जागेवर आपल्याला उभा करतो आणि आपले फोटो काढतो, अभिषेकने काढलेले काही फोटो मी या पोस्टमध्ये टाकले आहेत, मला ते फार आवडतात. वाढदिवसाच्या निमित्ताने त्याला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा, असे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले.

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकामिलिंद गवळी