मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार अभिनयासह अन्य क्षेत्रांमध्येही नशीब आजमावतांना दिसत आहेत. यात अनेक कलाकारांनी अन्य उद्योग-व्यवसायांमध्ये गुंतवणूक करत नव्या क्षेत्रांमध्ये पदार्पण केलं आहे. अलिकडेच अभिनेत्री श्रेया बुगडे (shreya bugade) रेस्टॉरंट सुरु केलं. त्यानंतर आणखी एका अभिनेत्री तिच्या स्वत:चं संगीत वाद्याचा व्यवसाय सुरु केला आहे.अबोली या मालिकेच्या माध्यमातून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे गौरी कुलकर्णी (gauri kulkarni). उत्तम अभिनयामुळे गौरी अल्पावधीत लोकप्रिय झाली. विशेष म्हणजे अभिनयासह तिने अहमदनगरमध्ये स्वत:चं संगीत वाद्याचं दुकान सुरु केलं आहे. याविषयी गौरीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली.
गौरी मूळची अहमदनगर येथील असून त्यांचं घराणं हे परंपरागत संगीत वाद्य बनवण्याचा आणि विकण्याचा व्यवसाय करतात. १९६५ सालापासून त्यांचं आर.बी. कुलकर्णी हे संगीत वाद्य विकण्याचं दुकान सुरु आहे. विशेष म्हणजे काळानुसार, त्यांच्या या दुकानाला नवा टच देण्यात आला आहे. नुकतंच या दालनाचं नुतनीकरण करण्यात आलं आहे.
"सस्नेह नमस्कार, नगरच्या ‘संगीतवाद्य’ क्षेत्रात अग्रेसर असलेल्या मे. आर. बी. कुलकर्णी हार्मोनियम मेकर्स अँड तबला मर्चंट. या दालनाच्या विस्तारित नवीन वास्तूमध्ये संगीत क्षेत्रातील सर्व संगीत साधकांना सर्व संगीत वाद्य एका छताखाली उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. तो उपलब्ध करून देताना अगदी प्रशस्त जागेत, सध्याच्या काळात प्रचलित असलेल्या मॉल संस्कृतीमध्ये आपली परंपरा जपण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे, असं कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
दरम्यान, गौरीने हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर सचित पाटील, सुयश टिळक, रेश्म टिपणीस यांसारख्या कलाकारांनी तिच्यावर शुभेच्छांचावर्षाव केला आहे. गौरी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून सध्या ती अबोली या मालिकेत काम करत आहे. यापूर्वी ती ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेत झळकली होती.