समाधान मिळेल अशाच भूमिका स्वीकारते -स्मिता बन्सल!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 01:07 PM2018-08-18T13:07:30+5:302018-08-19T06:30:00+5:30
‘कर्ज’ आणि ‘हम तो मोहब्बत करेगा’ या हिंदी तसेच ‘दया’ या मल्याळम चित्रपटात आपल्या अभिनयाची चुणूक दाखविणारी स्मिता बन्सल विविध टीव्ही मालिकांमधूनही घराघरात पोहोचली आहे.
‘कर्ज’ आणि ‘हम तो मोहब्बत करेगा’ या हिंदी तसेच ‘दया’ या मल्याळम चित्रपटात आपल्या अभिनयाची चुणूक दाखविणारी स्मिता बन्सल विविध टीव्ही मालिकांमधूनही घराघरात पोहोचली आहे. स्मिता सध्या ‘नजर’ या हॉरर मालिकेचा भाग बनली असून ती त्यात एक महत्त्वाची भूमिका साकारत आहे. एकंदरीत तिच्या भूमिकेबाबत आणि आतापर्यंतच्या तिच्या प्रवासाबाबत ‘सीएनएक्स’ने तिच्याशी मारलेल्या मनसोक्त गप्पा...
* या मालिकेसाठी तुला विशेष काय तयारी करावी लागली?
या प्रोजेक्टच्या संपूर्ण टीमने चांगलाच होमवर्क केला होता, त्यामुळे जास्त मेहनत घ्यावी लागली नाही. विशेषत: ही मालिका हॉरर असल्याने अभिनयातून रिअॅलिटी वाटण्यासाठी मी हॉरर चित्रपट पाहिले. त्यातिल अॅक्टर्स अॅक्टिंग कसे करतात याचा बारकाईने अभ्यास केला.
* या मालिकेचे वेगळेपण काय आहे?
ही एक सुपरनॅच्युरल हॉरर मालिका असून ती एका डायनवर आधारित आहे. आतापर्यंत डायनवर आधारित खूपच कमी चित्रपट वा मालिका बनल्या आहेत. मात्र प्रेक्षकांंच्या आवडीनुसार या मालिकेची निर्मिती करण्यात आली आहे. यात जी नायिका डायन बनली आहे, ती अगदी साधारण वागते, मात्र आपल्या नजरेतून सर्वकाही तिच्या मनासारखे घडविते. यामुळे मालिका पाहताना जो थ्रिलपणाचा अनुभव येतो, तो पाहण्यासारखा आहे.
* अभिनय क्षेत्रात आलेल्या अडचणींचा तू कसा सामना केला?
-मी अगदी १७ व्या वर्षापासूनच या क्षेत्रात पदार्पण केले आहे. तसे पाहिले तर मला या क्षेत्रात सहज अॅक्टिंगची संधी मिळाली. मात्र या क्षेत्रात येणे म्हणजे काम मिळविणे पाहिजे तसे कठीण नाही, मात्र ते टिकवून ठेवणे खूपच कठीण आहे, आणि मी ते टिकवून ठेवण्यासाठी खूपच स्ट्रगल केला आहे.
* भविष्यात चित्रपटात संधी मिळाल्यास कोणत्या प्रकारच्या भूमिकेस प्राधान्य देशील?
- जो अभिनय मला समाधान देईल, तिच भूमिका मी स्वीकारेल. विशेष म्हणजे टीव्ही मालिकांमुळेच मी इथपर्यंतचा यशस्वी प्रवास करु शकले. चित्रपटाच्या बाबतीत सांगायचे झाले तर त्यातील भूमिका येतात आणि काही काळानंतर एक्सपायर होतात, मात्र मालिकांचे तसे नाही. माझ्यामते मालिकेतील भूमिका कायम जीवंत राहतात.
* अभिनय क्षेत्रात येणाऱ्या नवोदित कलाकारांना काय संदेश देशील?
- टीव्ही क्षेत्रात तसे हार्डवर्कला खूपच महत्त्व आहे. विशेषत: या क्षेत्रात लवकर कधी यश मिळत नाही, आणि मिळालेच मिळालेच तर ते टिकविता येत नाही. या क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर पॅशन ठेवणे खूपच महत्त्वाचे आहे. शिवाय नेहमी शिकण्याची वृत्ती ठेवा. काम मिळाले म्हणजे मला सर्व काही येतं असं समजू नका. तसेच आपल्या कामाप्रती प्रामाणिक राहा. नक्कीच यशस्वी व्हाल.