Join us

"म्हणून राज ठाकरेंना मनापासून "साहेब" म्हणावसं वाटतं....", मराठमोळ्या अभिनेत्याची 'ती' पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 12:24 IST

सध्या या अभिनेत्याची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.

Bigg Boss Marathi 2 च्या माध्यमातून विशेष प्रकाश झोतात आलेला अभिनेता म्हणजे अभिजीत केळकर. बिग बॉसमध्ये झळकलेल्या अभिजीतने मराठीतील 'तुझे माझे जमेना', 'मधु इथे आणि चंद्र' तिथे अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. छोटा पडदा गाजवणाऱ्या अभिजीतने 'काकस्पर्श', 'बालगंधर्व' या गाजलेल्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. आज अभिजीत मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो.त्यामुळे चाहत्यांमध्ये त्याची कायमच चर्चा रंगत असते. 

अभिजीत सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. सोशल मीडियावर त्याची एक पोस्ट सध्या कचर्चेत आली आहे. ही पोस्ट त्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी लिहिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गवरील रस्त्याचा काम प्रलंबित आहे. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे कोकण दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांना मुंबई कोकण रस्त्यावरच्या दुरवस्थेचा अनुभव आला. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत महामार्गच्या  कामबाबत चर्चा झाली. 

अभिजीतनं याच संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. राज ठाकरेंच्या बातमीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत. . म्हणून ह्यांना मनापासून "साहेब" म्हणावसं वाटतं... धन्यवाद राजसाहेब असं कॅप्शन त्यानं या फोटोला दिलं आहे. 

टॅग्स :अभिजीत केळकरराज ठाकरे