स्टार प्रवाहवर सुरु होणाऱ्या 'तू ही रे माझा मितवा' (Tu Hi Re Maza Mitwa) मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या मालिकेच्या निमित्ताने तब्बल ९ वर्षांनंतर अभिनेता अभिजीत आमकर (Abhijit Amkar) मालिकाविश्वात पुनरागमन करणार आहे. ही मालिका तू ही रे माझा मितवा २३ डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
तू ही रे माझा मितवा मालिकेविषयी अभिजीत आमकर म्हणाला की, या मालिकेतून एक अनोखी लव्हस्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अर्णव आणि ईश्वरी या एकमेकांच्या प्रेमात जितके बुडाले आहेत तितकेच ते एकमेकांचा तिरस्कारही करतात. म्हण्टलं तर एकमेकांशिवाय जगता येत नाही आणि म्हटलं तर एकमेकांसोबत रहाताही येत नाही. थोडक्यात प्रेम करुन कात्रीत सापडलेल्या अर्णव आणि ईश्वरीची हटके लव्हस्टोरी म्हणजे तू ही रे माझा मितवा ही मालिका.
पुढे तो म्हणाला की, अर्णव सात्विका राजेशिर्के असं मी साकारत असलेल्या पात्राचं नाव आहे. प्रचंड कष्टाळू, प्रामाणिक पण तितकाच रागीट आणि गर्विष्ठ स्वभावाचा असा हा अर्णव. अर्णवला फसवणूक करणाऱ्यांविषयी मनस्वी चीड आहे. त्यांना धडा शिकवण्यासाठी तो काहीही करु शकतो. स्वबळावर सगळं करता येतं यावर त्याचा विश्वास आहे. त्याचं विश्व तो आणि त्याची बहीण इतकंच आहे. यापलीकडे तो कुणाहीसाठी कसलाही त्याग करु शकत नाही. अर्णव आणि माझ्या स्वभावात बरंच साम्य आहे. अर्णव प्रमाणेच माझ्या आयुष्यात व्यायामाला प्रचंड महत्त्व आहे. शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातूनही वेळ काढून मी न चुकता व्यायाय करतो.
९ वर्षांनंतर करतोय मालिकेत कामस्टार प्रवाह मला माझ्या कुटुंबाप्रमाणेच आहे. ९ वर्षांपूर्वी मी स्टार प्रवाहच्या अरे वेड्या मना मालिकेतून मालिकाविश्वात पदार्पण केलं. इतक्या वर्षांनंतर पुन्हा हा योग जुळून आला आहे. महाराष्ट्राच्या नंबर वन वाहिनीसोबत पुन्हा एकदा जोडला जातोय याचा अतिशय आनंद आणि अभिमान आहे, असे त्याने सांगितले.