Join us  

ओळखलंत का या क्युट मुलाला? आईसोबत बसलेला हा मुलगा टीव्ही इंडस्ट्रीवर करतोय राज्य, भाऊ देखील होता लोकप्रिय अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2023 4:32 PM

या मुलाने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली. यासोबतच या मुलाने अनेक ब्रँडसोबत काम केले आहे.

बॉलिवूड नाही तर आता टीव्ही स्टार्सचे बालपणीचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आज आम्ही तुम्हाला टीव्हीवर राज्य करणाऱ्या एका मुलाच्या फोटोबद्दल सांगत आहोत. टीव्ही जगतात आर्यन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मुलाचे कुटुंबही खूप लोकप्रिय आहे. या अभिनेत्याच्या मोठ्या भावाने अनके चित्रपटांमध्ये काम केलं आहे आणि आपल्या प्रत्येक भूमिकेने चाहत्यांची मनं जिंकली.

फोटोत दिसणाऱ्या या गोंडस मुलाचे मोठे फिमेल फॅन फॉलोईंग आहे. या मुलाच्या भावाने सिनेसृष्टीत आपली ओळख निर्माण करते  2020 मध्ये वयाच्या अवघ्या 50 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला होता. या मुलाने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली. यासोबतच या मुलाने अनेक ब्रँडसोबत काम केले आहे.  2015 मध्ये 'ये वादा राहा'मध्ये कॅमियो केला आणि त्यानंतर 2017 मध्ये कुंडली भाग्य मध्ये छोट्या भूमिकेद्वारे पदार्पण केले.

फोटोत दिसणारे हा क्युट मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून आर्यन म्हणजेच टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका 'इमली'चा अभिनेता फहमान खान आहे. मेरे डॅड की दुल्हन, अपना टाइम भी आएगा, इश्क में मरजावान सारख्या शोमध्ये दिसला आहे. अलिकडेच तो 'सात वचन' मध्ये दिसला होता. 

भारतीय टेलिव्हिजनचा हँडसम हंक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फहमन खानचे सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग   आहे. अलीकडेच तो अभिनेत्री हिबा नवाबसोबत तबिश पाशाच्या बेरादा गाण्यात रोमान्स करताना दिसला. प्रेक्षकांना हे गाणे खूप आवडले. चाहत्यांनी त्याचे भरभरून कौतुक केलं होतं. 

टॅग्स :टिव्ही कलाकार