Join us

अभिनेता गौरव घाटणेकरची ललित २०५ मध्ये एन्ट्री, शूटिंगला केली सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 9:57 AM

‘ललित २०५’ या मालिकेने १०० एपिसोड्स पूर्ण  केले आहेत. यानिमित्ताने सेटवर केक कापून सेलिब्रेशन करण्यात आलं होते. या खास प्रसंगी मालिकेचे निर्माते सुचित्रा बांदेकर आणि सोहम बांदेकर सेटवर हजर होते.

'वीरगती' या वेबफिल्म नंतर, पाँडेचेरी या सचिन कुंडलकर दिग्दर्शित चित्रपटाचे चित्रीकरण संपवून गौरव आता छोट्या पडद्यावर एंट्री करण्यासाठी सज्ज झाला आहे. लवकरच  स्टार प्रवाहवरील मालिका 'ललित २०५' मध्ये त्याची एंट्री होणार आहे. या मालिकेच्या शूटिंगलाही त्याने सुरूवात केली आहे. त्याच्या एंट्रीने मालिकेत नवीन वळण आल्याचे पाहायला मिळेल. गौरव घाटणेकर मराठी टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील एक नावाजलेले नाव आहे. छोट्या पडद्यावरील ‘तुज विन सख्या रे’ या मालिकेतून गौरव घराघरांत पोहोचला होता. मराठी सिनेमा आणि हिंदी मालिकांबरोबरच हिंदी आणि उर्दू नाटकांतूनही त्याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

 

गौरवला पहिला ब्रेक 'रुस्तम की दास्ताँ' या सिनेमातून मिळाला होता. नुकताच प्रदर्शित झालेला प्रियांका चोप्राचा ‘काय रे रास्कला’ हा दुसरा मराठी सिनेमात गौरवने मुख्य भूमिकेत झळकला होता. आता पुन्हा एकदा तो छोट्या पडद्यावर झळकणार म्हटल्यावर नक्कीच त्याची भूमिका रसिकांची पसंतीस पात्र ठरावी यासाठी तो खूप मेहनतही घेत आहे. 'ललित २०५'मध्ये सुहास जोशी, सागर तळाशीकर, धनश्री दवांगे, संग्राम समेळ, अमृता पवार, अनिकेत केळकर, कीर्ती मेहेंदळे, अमोघ चंदन, मानसी नाईक हे कलाकार या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. 

‘ललित २०५’ या मालिकेने १०० एपिसोड्स पूर्ण  केले आहेत. यानिमित्ताने सेटवर केक कापून सेलिब्रेशन करण्यात आलं होते. या खास प्रसंगी मालिकेचे निर्माते सुचित्रा बांदेकर आणि सोहम बांदेकर सेटवर हजर होते. मालिकेचे शंभर भाग पूर्ण झाल्यामुळे सेटवर उत्साहाचं वातावरण होतं. निर्माता म्हणून सोहम बांदेकरची ही पहिलीच मालिका असल्यामुळे तो खुपच एक्सायटेड होता.

टॅग्स :ललित 205गौरव घाटणेकर