Join us

सलग 2 वर्ष डेटिग करून या अभिनेत्याने बहिणीसोबत केले लग्न, वाचा काय आहे ही भानगड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2020 07:00 IST

या अभिनेत्यावर कास्टिंग काउचसारखा गंभीर आरोपही करण्यात आला होता. सध्या हा अभिनेता सिनेइंडस्ट्रीतून गायब आहे.

बॉलिवूडमधील बरीच कास्टिंग काउचची प्रकरणं आपली ऐकली आहेत. कास्टिंग काउचसारखा गंभीर आरोप अभिनेता अमन वर्मावरदेखील करण्यात आला होता. त्यामुळे त्याची 46 वर्षांची कारकीर्द धोक्यात आली होती. अमन वर्मा यांच्यावर 2005 मध्ये आरोप लावला गेला होता, ज्यामुळे तो बिग बॉस या रिएलिटी शोमध्येही सामील झाला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही आणि तो इंडस्ट्रीपासून खूप दूर गेला. आपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटेल की अमन वर्माने आपल्या बहिणीशी लग्न केले. अमन वर्माने त्याच्या सख्या बहिणीसोबत नव्हे तर ऑनस्क्रीन असलेली बहीण वंदना लालवानीशी लग्न केले.14 डिसेंबर 2015 रोजी दोघांची साखरपुडा झाला होता आणि काही दिवसांनी 20 एप्रिल 2016 रोजी त्यांचे लग्न झाले. अमनच्या लग्नाची तयारी चालू असताना, लग्नाच्या एक दिवस आधी त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. वडिलांच्या निधनानंतर अमनने लग्न थांबवले. पण त्याच्या कुटुंबियांनी या दोघांचे लग्न अगदी साधेपणाने केले. लग्नाच्या सर्व विधी पूर्ण झाल्या. यानंतर या दोघांनी 2017 मध्ये धूमधडाक्यात लग्न केले.

अमन वर्मा म्हणाला होता की, आम्ही वडिलांच्या निधनानंतर पुढच्या वर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

अमनने सांगितले की त्याची आई 1 वर्ष वाट बघू शकत नव्हती. या कारणास्तव, त्यांचे 14 डिसेंबर 2016 रोजी लग्न झाले.

अमन म्हणाला की माझ्या मते लोकांनी एकाच वेळी लग्न केले पाहिजे, जेव्हा दोघे लग्नासाठी तयार असतात आणि आमच्यासाठी लग्न करण्याची योग्य वेळ होती आणि वंदना माझ्यावर खूप खुश होती, मग आम्ही दोघांनी लग्न केले.

आम्ही लग्नाआधी 2 वर्षे रिलेशनशीपमध्ये देखील राहिलो.

टॅग्स :कास्टिंग काऊच