Join us

रोज सकाळी पत्नी अन् मुलींच्या पाया पडतो 'हा' अभिनेता, कारण सांगत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 17:38 IST

अभिनेत्याच्या पत्नीने पहिल्या बाळाच्या जन्मानंतर ९ महिन्यातच दुसऱ्या बाळाला जन्म दिला होता.

सध्या असे अनेक टीव्ही स्टार आहेत जे घर संसारात रमले आहेत. प्रिन्स-युविका, करमवीर बोहरा, दृष्टी  धामीसह काही कलाकार नुकतेच आईबाबा झाले आहेत. दरम्यान एका अभिनेत्याच्या पत्नीने पहिल्या बाळाच्या जन्मानंतर ९ महिन्यातच दुसऱ्या बाळाला जन्म दिला होता. तिची दुसरी डिलीव्हरी ही प्री मॅच्युअर होती. आज तो अभिनेता रोज आपल्या पत्नी आणि दोन्ही मुलींच्या पाया पडतो. कोण आहे तो?

२०१२ साली आलेल्या टीव्हीवरील 'रामायण' मालिकेत प्रभू श्रीराम आणि सीतामातेच्या भूमिकेत दिसलेले गुरमीत चौधरी (Gurmeet Choudhary) आणि देबिना बॅनर्जी (Debina Bonnerjee). या मालिकेने त्यांना खूप लोकप्रियता दिली. नंतर दोघांनी खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधली. त्यांना दोन गोंडस मुली आहेत. नुकतंच गुरमीत एका मुलाखतीत तो म्हणाला, "देबिना आल्यानंतर माझं आयुष्यच बदललं. आता मी तिच्याशिवाय आणि माझ्या दोन्ही मुलींशिवाय आयुष्याची कल्पनाही करु शकत नाही. पत्नीच्या पाया पडण्याची काय गरज आहे? यावरुन नेहमीच चर्चा होते. विक्रांत मेस्सीने करवा चौथला पत्नीचा आशीर्वाद घेतला होता. तर तो ट्रोल झाला होता. पण मी सुद्धा माझ्या पत्नीच्या पाया पडतो. महिलांना याचा हक्क आहे."

तो पुढे म्हणाला, "महिला अशा काही गोष्टी करु शकते ज्याची पुरुष कल्पनाही करु शकत नाहीत. काही तुलनाच होऊ शकत नाही. मी तिला आमच्या मुलींना जन्म देताना पाहिलं आहे. एवढं करुन ती संपूर्ण घराची काळजी घेते. प्रोफेशनमध्येही ती प्रगती करते. महिला मल्टिटास्क करतात. आपण पुरुष हे करु शकत नाही. माझी पत्नी माझ्यासाठी देवासमानच आहे. तिने माझी खूप साथ दिली आहे. ती माझी सर्वस्व आहे. रोज सकाळी मी माझ्या दोन्ही मुलींच्याही पाया पडतो."

टॅग्स :गुरमीत चौधरीपरिवारटिव्ही कलाकार