Join us

मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे झाला जुळ्या मुलांचा बाबा, नाव ठेवलं...!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2021 16:05 IST

मराठी कलाविश्वातील एक लोकप्रिय अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) बाबा झाला आहे. होय,  संकर्षणच्या घरी दोन चिमुकल्या पाहुण्यांचं आगमन झालं आहे.

ठळक मुद्देपरभणीचं नाव मनोरंजन विश्वात गाजवणारा अभिनेता म्हणजे संकर्षण.  चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही क्षेत्रात त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.

मराठी कलाविश्वातील एक लोकप्रिय अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) बाबा झाला आहे. होय,  संकर्षणच्या घरी दोन चिमुकल्या पाहुण्यांचं आगमन झालं आहे. संकर्षणच्या पत्नीने  २७ जून रोजी मुलगा आणि मुलगी अशा  जुळ्या बाळांना जन्म दिला. त्यानंतर पहिल्यांदाच संकर्षणने त्याच्या बाळांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांना दिली. खास म्हणजे यावेळी त्याने बाळांचं नावदेखील जाहीर केलं आहे. संकर्षणने शेअर केलेल्या फोटोत या फोटोमध्ये बाळांचा चेहरा दिसत नाही. पण बाबा झालेल्या संकर्षणच्या चेह-यावरचा आनंद मात्र स्पष्ट दिसतो. आपल्या गोंडस बाळांकडे संकर्षण अतिशय प्रेमानं बघताना दिसतोय.

संकर्षणने त्याच्या बाळांचं नाव ‘सर्वज्ञ’ आणि ‘स्रग्वी’ ठेवलं आहे. या नावांचा अर्थही त्यानं सांगितला आहे. सर्वज्ञ म्हणजे,सर्व जाणनारा , ज्ञानी आणि स्रग्वी म्हणजे पवित्रं तुळस..., असं त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.संकर्षण हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता असून उत्तम लेखक व कवीदेखील आहे. संकर्षणने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपट, नाटक, रिअ‍ॅलिटी शो यांच्यामध्ये काम केलं आहे.

परभणीचं नाव मनोरंजन विश्वात गाजवणारा अभिनेता म्हणजे संकर्षण.  चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही क्षेत्रात त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. महाराष्ट्राचा सुपरस्टार या झी मराठीच्या कार्यक्रमात 2008 ला तो दिसला होता. ‘माझीया प्रियाला’ आणि ‘आभास हा’ या मालिकांमध्ये  संकर्षणने काम केले आहे. झी मराठीवरील ‘रामराम महाराष्ट्र’चे सूत्रसंचालनही त्याने केलं.  यासोबतच  लोभ असावा, मी रेवती देशपांडे  या लता नार्वेकर यांच्या व्यावसायिक नाटकात संकर्षण होता. संकर्षण  त्याच्या उत्तम अभिनयासोबतच सर्वात जास्त चर्चेत असतो ते त्याच्या जबरदस्त कवितांमुळे. त्यानं लिहिलेल्या कविता त्याच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना नेहमीच विचांर करायला भाग पाडतात. त्याच्या लेखनीची जादू त्याच्या एका पेक्षा एक अशा लयभारी कवितांमधून पाहायला मिळते.

टॅग्स :टेलिव्हिजन