छोट्या पडद्यावरील 'जग जाननी माँ वैष्णो देवी - कहानी माता रानी की' आपल्या आश्चर्यकारक कथा आणि स्टारकास्टने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. सध्या देशात 21 दिवसांचा लॉकडाउन करण्यात आला आहे, ज्यामुळे देशातील सर्व लोक आपल्या घरात राहत आहेत आणि कोरोना संक्रमणाविरूद्ध एकत्र लढा देत आहेत. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत चालली असताना मुंबईतही याची वाढलेली आकडेवारी चिंता व्यक्त करणारी आहे. अशातचया शोमध्ये, राजा रत्नाकरची भूमिका साकारणारा अभिनेता हृषिकेश पांडे नाशिकमधील शाळेत शिकणार्या आपल्या मुलाबरोबर दर्जेदार वेळ घालवत आहे.
शूटिंगदरम्यान कुटुंबाला वेळ देणे कालाकारांना शक्य होत नाही. त्यामुळे हा कवॉरंटाईन कमी आणि क्वॉलिटी टाईम जास्त बनवण्याकडे कलाकरांचा कल असल्याचे पाहायला मिळत आहे. अभिनेता हृषीकेश पांडे म्हणतो की, मी हा वेळ, जो माझ्या मुलाबरोबर घालवत आहे तो कायम लक्षात ठेवीन. माझा मुलगा नाशिकमधील एका शाळेत शिक्षण घेत आहे, परंतु कोरोना झाल्याची आणि सर्व शाळा बंद झाल्याचे समजताच मी लगेच माझ्या मुलाला इथे मुंबईत आणले.
या क्षणी, त्याच्या परीक्षा संपल्या आहेत. त्यानी अलीकडेच शाळा सुरू केली आहे, त्यांना नवीन अभ्यासक्रमाची पुस्तकेही मिळाली नाहीत. शाळा सुरू होताच परीक्षा लवकरच येण्याची शक्यता आहे म्हणून मी इंटरनेटवरून अभ्यासक्रम शोधून त्याला शिकवत आहे जेणेकरून त्याच्यावर जास्त दबाव येऊ नये.
हृषीकेश पुढे म्हणाला की, मी आजकाल माझ्या मुलाच्या हिंदी भाषेकडे खूप लक्ष देत आहे कारण त्याची भाषा थोडी कमजोर आहे. म्हणूनच मी त्याला हिंदी शिकवण्याच्या प्रयत्नात व्यस्त आहे. अशा परिस्थितीत अभिनेता हृषिकेश पांडे आपल्या मुलाबरोबर वेळ घालवणेही इतसारासठी देखील प्रेरणादायी आहे.