लोकांच्या मनात महिलांना कुठल्या दृष्टिकोनातून बघायला हवे याविषयीची पक्की धारणा निर्माण झालेली आहे. अजूनही महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोण समाजात बदललेला नाही. दिवसेंदिवस रोज काही ना काही टिका टिप्पणी महिलांवर होतच असते. त्यातच तुम्ही अभिनय क्षेत्राशी संबंधित असाल अन् तुमचे शरीर वाढले असेल तर लोक लगेचच बॉडी शेमिंग करायला सुरुवात करतात. अभिनेत्री आणि अभिनेता करण मेहराची पत्नी निशा रावळ ही सध्या याच गोष्टीला घेवून खूप हैरान झाली आहे.
याकारणामुळे तिने सोशल मीडियावचा वापरही कमी केला आहे. जेव्हा जेव्हा निशा तिचे फोटो शेअर करते. तेव्हा कमेंटस आणि लाईक्सपेक्षा युजर्स ती प्रेग्नंट आहे का? असे प्रश्न विचारताना दिसतात. मात्र प्रेग्नंट असेन नसेन याचा युजर्स ना काय करायचे आहे. सतत खासगी प्रश्न विचारणा-यांवर निशा चांगलीच संतापली आहे. तिने म्हटले की, माझ्या पोटाकडे बघून असे प्रश्न विचारले जातात. सतत टिका करण्यापेक्षा चांगल्या गोष्टी करण्यात मन रमवा हेच तुमच्यासाठी जरा जास्तच फायदेशीर असेल असे सांगत तिने युजर्सची चांगली शाळा घेतली.
निशाने यावर आता चक्क एक भली मोठी पोस्टच लिहीली आहे. तिने यात लिहीले आहे की, 'लग्नानंतर बॉडी शेमींगवर ही माझी तिसरी पोस्ट आहे. हे फोटो काल क्लिक केले आहे आणि हो मी गर्भवती नाही.लग्नाआधीपासूनच माझे असेच पोट आहे. वजन कमी जास्त होते त्यानुसार पोटाचा आकारही कमी जास्त होत असतो.
पोट कमी करण्यासाठी नेहमी त्यावर काम केले आणि जिममध्ये बरेच तास घालवले. लग्नानंतर साहजिकच माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोणही बदलत गेला आणि म्हणून जेव्हा जेव्हा लोक मला बघतात तेव्हा त्यांना मी प्रेग्नंटच असल्याचे त्यांना वाटते.