Join us  

मालिकेच्या सेटवर शूटिंग करताना खरंच लागली आग, थोडक्यात वाचला अभिनेता; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 11:52 AM

त्याने स्वत: व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये ही भयानक दुर्घटना दिसत आहे.

हिंदी मालिकांमध्ये दिसणारा लोकप्रिय अभिनेता करण वोहरा (Karan Vohra) थोडक्यात वाचला आहे. 'नाम नमक निशान' मालिकेचं शूट करत असताना आगीचा भडका त्याच्या अंगावरच उडाला. त्यातून तो बचावला. ही घटना त्याच्या सहकलाकारने कॅमेऱ्यात कैद केली. करणने स्वत: व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये ही भयानक दुर्घटना दिसत आहे.

अमेझॉन मिनी टीव्हीवरील शो 'नाम नमक निशान' चं शूट सुरु होतं. यावेळी करण वोहराचा गार्डन एरियामध्ये फायर ओव्हनचं झाकण उघडायचा सीन होता. त्याने जसं झाकण उघडलं आगीचा भडका त्याच्या अंगावरच आला. त्याच्या चेहऱ्यावरही भडका उडाला. त्या तात्काळ झाकण फेकले आणि तो मागे झाला. यानंतर त्याचा सहकलाकार वरुण सूद धावत त्याच्याजवळ गेला. करणने व्हिडिओ शेअर करत लिहिले, 'कसंतरी वाचलो. वरुण फक्त तूच ही घटना डोळ्यांनी पाहिलीस.'

वरुण सूदनेही कमेंट करत लिहिले, 'हे खूपच भयानक होतं. तू चॅम्पियन सारखं हे सांभाळून घेतलंस'. इतर कलाकरांनीही कमेंट करत करणची विचारपूस केली. करण या अपघातातून थोडक्यात वाचला आहे आणि आता ठीक आहे. मालिका, सिनेमांच्या सेटवर अनेकदा असे अपघात होतात. करणचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

टॅग्स :टिव्ही कलाकारअपघातटेलिव्हिजनसोशल मीडिया