Join us  

देशभर अराजक, निराशाजनक परिस्थिती असताना..; भारताने T20 WC जिंकल्यावर किरण मानेंची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 1:10 PM

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते किरण माने यांनी भारताने T20 वर्ल्डकप जिंकल्यावर लिहिलेली खास पोस्ट चर्चेत आहे (T20 WC)

कालचा शनिवार २९ जून २०२४ ही तारीख कोणीही विसरणार नाही. कारण अनेक वर्षांनंतर भारताने सर्वांसाठी एक आनंदाचा क्षण दिला. कारण एव्हाना सर्वांना कळलं असेलच. भारताने T20 वर्ल्डकपवर स्वतःचं नाव कोरल. काल देशभर नव्हे तर जगभरात जिथे जिथे भारतीय असतील त्यांनी जल्लोष साजरा केला. मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते किरण  माने यांनी टीम इंडियाचं अभिनंदन करताना सोशल मीडियावर लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे,

किरण माने भारताने T20 वर्ल्डकप जिंकल्यावर काय म्हणाले?

किरण मानेंनी चक दे इंडिया सिनेमातील क्लायमॅक्सच्या दृश्याचा एक व्हिडीओ पोस्ट केलाय. या व्हिडीओत शाहरुख महिला संघाने हॉकीचा वर्ल्डकप जिंकल्यावर स्टेडिममध्ये फडकणाऱ्या तिरंग्याकडे पाहतोय. हा प्रसंग शेअर करत किरण माने लिहितात, "जल्लोष करणार्‍या प्रत्येक सच्च्या भारतीयाची 'आतून' अशी अवस्था आहे.... देशभर अराजक आणि निराशाजनक परिस्थिती असताना क्रिकेट टीमनं कित्येक वर्षांनी एक आनंदाची लाट आणली. १९८३ आणि २०११ नंतर काल सगळा देश एक होऊन, हातात तिरंगा घेऊन नाचताना पाहिला. लब्यू टीम इंडीया. जय हिंद !"

अन् भारताने T20 विश्वचषकावर कोरलं नाव

भारताच्या क्रिकेट संघाने शनिवारी ऐतिहासिक कामगिरी केली. रोहित शर्माच्या नेतृत्वातखाली टीम इंडियाने १३ वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकलीय. याशिवाय २००७ नंतर भारताने प्रथमच T 20 विश्वचषकावर स्वतःचं नाव कोरलं. दक्षिण आफ्रिकेच्या तोंडचा घास पळवून रोहितसेनेने हा विजय साकारला. जेतेपद पटकावल्यानंतर सर्वच भारतीय खेळाडू भावूक झाल्याचे दिसले. या विजयानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटला अर्थात ट्वेंटी-२० क्रिकेटला रामराम केले.

 

टॅग्स :किरण मानेटी-20 क्रिकेटट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024भारतरोहित शर्माशाहरुख खान