Join us  

"बेरोजगारी,भाड्याचं घर, हताश झालो, पण पत्नीने..", प्रसिद्ध अभिनेत्याने स्ट्रगलबद्दल केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 5:19 PM

‘संडे टेंगो’ हा स्टार प्लस वाहिनीवरील शो होस्ट करण्याची संधी त्याला मिळाली आणि त्याने या संधीचे सोने केले.

मनीष पॉल  कोणत्याच परिचयाची गरज नाही. होस्ट म्हणून मनीषने आपली ओळख निर्माण केली. आज तो इंडस्ट्रीचा नंबर 1 होस्ट आहे. केवळ इतकेच नाही तर अभिनेता म्हणूनही त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे.  छोट्या पडद्यावरुन मोठ्या पडद्यापर्यंत यशस्वी वाटचाल करणारा या हरहुन्नरी अभिनेत्याचा हा प्रवास सोपा नव्हता.  मुंबईत मनीषचा जन्म झाला. पण त्याचे अख्खे बालपण दिल्लीत गेले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो मुंबईत दाखल झाला.

एका मुलाखतीत मनीष पॉलने स्वत:बद्दल खुलासा केला की त्याने आपल्या करिअरबाबत मोठा निर्णय कसा घेतला. तो एक वर्ष घरी बसला होता, त्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र या काळात पत्नीने त्याची साथ सोडली नाही.

ह्युमन ऑफ बॉम्बेनुसार, तो म्हणाला- 2007 मध्ये माझं लग्न झालं. नंतर 2008 मध्ये माझ्याकडे कोणतेही काम नव्हते. मी इकडे तिकडे पैसे कमवत होतो.पण त्यात आनंद नव्हता. मी इथे हे करण्यासाठी आलेलो नाही असं मला वाटू लागले. मला काहीतरी वेगळं करायचं होतं. घरी आल्यावर मला आनंदी वाटेल असं काम मला करायचं होतं.”

पुढे तो म्हणाला, 'मी सर्व काही सोडून घरी बसलो. माझ्याकडे पैसा नव्हते, कमाई नव्हती. माझ्याकडे भाडे द्यायलाही पैसे नव्हते. अशा परिस्थितीत  माझी पत्नी संयुक्ताने घराची संपूर्ण जबाबदारी तिने स्वत:च्या खांद्यावर घेतली, सर्व काही सांभाळले. वर्षभर असंच चाललं.. या काळात कितीतरी वेळा हताश झालो, अजून किती वेळ लागेल.  पण मी स्वतःला सावरलं. यात मला माझ्या पत्नीने खूप मदत केली.”

 2002 मध्ये पहिल्यांदा ‘संडे टेंगो’ हा स्टार प्लस वाहिनीवरील शो होस्ट करण्याची संधी त्याला मिळाली आणि त्याने या संधीचे सोने केले. यानंतर झी म्युझिक वाहिनीसाठी व्हीजे म्हणून त्याने काम केले. रेडिओ सिटी या रेडिओ वाहिनीवर मनीषने रेडिओ जॉकी म्हणूनही त्याने काम केले आणि बघता बघता छोट्या पडद्यावरचा नंबर 1 होस्ट बनला. पुढे अभिनयक्षेत्रातही तो आला. 

टॅग्स :टिव्ही कलाकार