Join us

'तिकळी' या मालिकेत अभिनेता पार्थ घाटगे दिसणार मुख्य भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 18:59 IST

Tikali Serial : सन मराठी वाहिनीवर लवकरच 'तिकळी' ही नवीन मालिका दाखल होत आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच भेटीला आला असून प्रोमोला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसत आहे.

सन मराठी वाहिनीवर लवकरच 'तिकळी' ही नवीन मालिका दाखल होत आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच भेटीला आला असून प्रोमोला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसत आहे. प्रेक्षकांना नेहमी काहीतरी नवं हवंच असतं त्यात आता ही तिकळी कोण ? हिचं रहस्य काय, जीच्यासोबत गावकरी दोन हाथ लांब राहतात, जीचं आयुष्यात असणं म्हणजे आयुष्य बर्बाद होणे, तिकळीला दिसणारी ती व्यक्ती कोण, व त्या व्यक्तीचं नेमकं  रहस्य काय अशा सगळ्या गोष्टी या मालिकेतून उलगडीस येणार आहेत. या मालिकेत वैष्णवी कल्याणकर आणि पूजा ठोंबरे मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबत या मालिकेत पार्थ घाटगे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

पार्थ घाटगेने इंस्टाग्रामवर तिकळी मालिकेच्या सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत त्याने लिहिले की, कसा वाटला प्रोमो ?… येतोय ‘तिकळी’या मालिकेतुन …‘वेद’च्या भूमिकेत…१ जुलैपासुन सोमवार ते शनिवार …रात्री १० वाजता…आपल्या लाडक्या सन मराठीवर… त्याच्या या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.

तिकळी मालिकेत पूजा ठोंबरे आणि वैष्णवी कल्याणकर या दोघींच्या रहस्यमय नात्यामागे काय कारण असणार हे आपल्याला पाहता येणार आहे. येत्या १ जुलैपासून ही मालिका सोम ते शनि रात्री १० वाजता भेटीला येणार आहे.