Join us

सिनेमा आणि मालिकांनंतर एकता कपूरच्या अभिनेत्याची नवा माध्यमात एंट्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 16:30 IST

सुरुवातीच्या काळात मी स्टेजवर अनेकदा नापास झालो.

सुप्रसिद्ध अभिनेता, गायक आणि अँकर राजीव खंडेलवाल याने त्याच्या आयुष्यातील संघर्षाची कथा हटके आणि मनोरंजक पद्धतीने 'फायर वर्क इंडिया' नावाच्या एका नवीन सोशल मीडिया अ‍ॅपद्वारे प्रेक्षकांसमोर आणलीय. पडद्यावरच्या आणि पडद्यामागच्या राजीव खंडेलवालची कहाणी प्रत्यक्षात किती खडतर होती याचा उलगडा त्याने या अ‍ॅपवर छोट्या छोट्या व्हिडिओंमधून केला आहे. 

"अभिनय कारकीर्दीत माझ्या अनेक छटा प्रेक्षकांना दिसल्या आहेत परंतु माझी कारकीर्द यशस्वी होण्यामागे प्रचंड संघर्ष होता, आणि हाच संघर्ष आज माझ्या यशाचा महत्त्वाचा दुवा आहे. आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात मी स्टेजवर अनेकदा नापास झालो मात्र माझ्या स्वप्नांप्रती मी कटिबद्ध राहण्याचे ठरवले, असे त्याने सांगितले आहे. आपल्या संघर्षाच्या कथेसोबतच स्वतःच्या अनुभवाच्या आधारे अभिनय क्षेत्रात नव्याने येणाऱ्या इच्छुकांना त्याने मार्गदर्शनहि केले आहे. इतर कोणावरही अवलंबून न राहता स्वतःच्या क्षमतांवर अवलंबून राहण्याचा सल्ला नवोदितांना त्याने दिला आहे.

राजीव सांगतो कि, ''त्याला त्याच्या प्रेक्षकांना एक कथा सांगायची आहे आणि त्यासाठी हे अनोखे अ‍ॅप अंत्यंत प्रभावी माध्यम आहे. सध्याच्या अनेक शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅपसपेक्षा या अ‍ॅपमधील वैशिष्ट्ये उत्कृष्ट, अद्वितीय आणि सुरक्षित आहेत ज्यामुळे फायरवर्क इंडिया अ‍ॅपवर माझ्या आयुष्यातील गोष्टीं प्रेक्षक आणि माझ्या चाहत्यांसोबत शेअर करण्यास मी उत्सुक आहे.''

 

टॅग्स :राजीव खंडेलवाल