‘खिचडी’मध्ये अभिनेता राजेशकुमार बनला रावण!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2018 9:44 AM
‘खिचडी’ या अत्यंत गाजलेल्या विनोदी मालिकेचे पुनरागमन लवकरच ‘स्टार प्लस’ वाहिनीवर होत असून प्रेक्षकांना आपल्या पूर्वीच्या आवडत्या कलाकारांबरोबर काही ...
‘खिचडी’ या अत्यंत गाजलेल्या विनोदी मालिकेचे पुनरागमन लवकरच ‘स्टार प्लस’ वाहिनीवर होत असून प्रेक्षकांना आपल्या पूर्वीच्या आवडत्या कलाकारांबरोबर काही नवे कलाकारही रंजक भूमिकांमध्ये पाहायला मिळणार आहेत. या मालिकेचा मूळ ढाचा आणि नर्म विनोदीपणा कायम राखतानाच निर्मात्यांनी त्यात अभिनेता राजेशकुमारला एका महत्त्वाच्या भूमिकेत सादर केले आहे. ‘खिचडी’ मालिकेत राजेशकुमार रावणाची भूमिका साकारणार आहे. ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या मालिकेत रोशेष ही व्यक्तिरेखा रंगविल्यानंतर राजेशकुमारचे नाव घरोघरी पोहोचले होते. मालिकेचे दिग्दर्शक आतिश कपाडिया यांनी सांगितले, “रावणाची जी रूढ आणि साचेबध्द प्रतिमा आहे, ती मला मोडीत काढायची होती. त्यामुळेच एरवी रावण हा वर्णाने काळा दाखविला जातो. पण राजेशकुमार गौरकांतीचा आहे. त्यामुळे राजेश हा ‘गोरा रावण’ होईल. ही भूमिका त्याच्या एका सहृदय आणि आईचा आज्ञाधारक मुलगा असलेल्या रोशेषपेक्षा पूर्णपणे भिन्न स्वभावाची आहे. यात तो तसा खलनायक असला, तरी पारेख कुटुंबियांना भेटल्यावर आणि त्यांच्या उचापती पाहून त्यालाही रडू फुटतं!” ‘हॅटस ऑफ प्रॉडक्शन्स’ची निर्मिती असलेल्या ‘खिचडी’ मालिकेतील नर्म विनोद प्रेक्षकांना सतत गुदगुल्या करीत त्यांना हसवत राहील.मालिका प्रथम ‘स्टार प्लस’ वाहिनीवर प्रसारित झाली आणि आता पुन्हा त्याच वाहिनीवर आम्ही तिचं प्रसारण करणार आहोत. मात्र यावेळी खिचडीचं प्रसारण आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धा एकाच वेळी होत असल्या, तरी आम्ही हे आव्हान स्वीकारलं आहे,” असे या मालिकेचे सह-निर्माते आणि एक मालिकेतील कलाकार जे. डी. मजिथिया यांनी सांगितलं. उमेशशिवाय ‘खिचडी’च्या नव्या आवृत्तीत रेणुका शहाणे, देबिना बॉनर्जी, सरिता जोशी आणि दीपशिखा नागपाल हे नामवंत कलाकारही काही भागांमध्ये सहभागी होणार आहेत