Join us

अभिनेता शशांक केतकर राहत नाही बायको आणि मुलासोबत, मोठे कारण आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 15:58 IST

Shashank Ketkar:अभिनेता शशांक केतकर सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका मुरांबामध्ये अक्षयच्या भूमिकेत पाहायला मिळतो.

अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका 'मुरांबा' (Muramba)मध्ये अक्षयच्या भूमिकेत पाहायला मिळतो. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांची खूप चांगली पसंती मिळताना दिसते आहे. शशांक सोशल मीडियावर खूप सक्रीय असून त्याचे खूप फॅन फॉलोव्हिंग आहे. त्याचे चाहते त्याच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतात. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना प्रोफेशनल आणि खासगी आयुष्याबद्दल बऱ्याचदा सांगताना दिसतो. दरम्यान त्याने एका मुलाखतीत भावुक होत सांगितले की तो बायको आणि मुलासोबत राहत नाही. इतकेच नाही तर त्याने यामागचे कारणदेखील सांगितले आहे. 

शशांक केतकरने एका मुलाखतीत सांगितले की, माझ्यामध्ये जो काही बदल झाला आहे तो आता खूपच वाखण्याजोगा आहे. मी आहे त्याच्यापेक्षा खूपच आता भावनिक झालो आहे. माझ्या मुलाची मला आठवण आली तरी पटकन डोळ्यात आता माझ्या पाणी येतं.

तो पुढे म्हणाला की, आता मी चित्रीकरणामुळे बाहेर आहे. त्यामुळे माझ्या मुलाला आणि प्रियंका हिला मी भेटू शकत नाही. कारण ते आता तिच्या माहेरी डोंबिवली येथे राहतात. आणि आमच चित्रीकरण आता मढ आयलंड येथे असल्यामुळे मला देखील त्यांना भेटणे होत नाही. कारण रोजच येणे जाणे होत नाही. माझे घर ठाण्यात आहे. त्यामुळे मी त्यांना देखील आता भेटू शकत नाही आणि माझे आई-वडील सध्या अमेरिकेला आहेत. त्यामुळे ते देखील इथे नाहीत. त्यामुळेच प्रियंका ही आता डोंबिवलीत आहे. एकूणच मी या दोघांनाही खूप मिस करतो. 

टॅग्स :शशांक केतकर