Join us

बाप हा बापच असतो! 'होणार सून मी या घर'ची फेम विनोद गायकरने लिहिले मुलीसाठी पुस्तक....

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2020 4:29 PM

प्रत्येक बाप आणि मुलीचं नातं हळुवार आणि संवेदनशील असते

प्रत्येक बाप आणि मुलीचं नातं हळुवार आणि संवेदनशील असते. प्रत्येक मुलीसाठी आपला ‘बाप’ सुपरहिरोच असतो. वेणूसाठी पण तिचा वडिल ही सुपरहिरोच आहे. होणार सुन मी या घरची फेम विनोद गायकर याने आपली मुलगी वेणूसाठी 100 गोष्टींचं वेणूच्या गोष्टी नावाचं पुस्तकं लिहिलं आहे.  त्याने आपल्या मुलीला वाढदिवसाच्या निमित्त ही अनोखी भेट दिली आहे. एकीकडे बालसाहित्य दुर्लभ होत असताना विनोदने चक्क १०० गोष्टींचं लहान मुलांसाठी पुस्तकच लिहीलं. 

यामध्ये वेणूच्याच नव्हे तर तिच्या वयाच्या मुलांच्या आवडीच्या सगळ्या गोष्टी आहेत. गणपती बाप्पा लहान मुलांच्या आवडीचा म्हणून  'गणूच्या गोष्टी', वेणूला 'फाईंडिंग  द निमो'  हा सिनेमा फार आवडतो म्हणून समुद्र विश्वातल्या गोष्टी... 

वेणूकडे डोनाल्ड डक टेडीबेअर आहे म्हणून 'डिटेक्टिव्ह डकीच्या गोष्टी' येणारा काळ हा SCI FI चा असणार आहे म्हणून रोबोटच्या म्हणजेच 'सुपर सोनेरीच्या गोष्टी...' प्राण्यांच्या गोष्टी, जादूच्या गोष्टी, राजा प्रधानाच्या गोष्टी, ढोलू मोलूच्या विनोदी गोष्टी.शास्त्रज्ञांच्या गोष्टी, खेळाडूंच्या गोष्टी,साधुसंतांच्या, गौतम बुद्धांच्या, महाराजांच्या गोष्टी  आणि ज्यांच्यामुळे विनोद इन्स्पायर झाला त्या सर्व गोष्टी. पुस्तकाला शीर्षक दिलंय ‘वेणूच्या गोष्टी’. बरं हा एवढ्यावरंच थांबला नाही तर त्याने लेकीसाठी गाणं सुद्धा तयार केलंय. खालील लिंकवर जाऊन गाणं ऐका. मस्त गाणं झालंय. विनोदने आतापर्यंत दूर्वा, देवयानी, दिल दोस्ती दोबारा,हम बने तुम बने अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजन