शमिष्ठा आणि त्यागराजनंतर 'या' अभिनेत्याची होणार बिग बॉसच्या घरात एंट्री!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2018 7:51 AM
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एकानंतर एक नवीन सदस्य जात आहेत. त्यामुळे प्रेक्षक आणि सदस्यांना दर आठवड्यामध्ये सरप्राईझ ...
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एकानंतर एक नवीन सदस्य जात आहेत. त्यामुळे प्रेक्षक आणि सदस्यांना दर आठवड्यामध्ये सरप्राईझ मिळत आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नुकतीच त्यागराज खाडिलकर आणि शर्मिष्ठा राऊत यांची एंट्री झाली. आता अजून एका सदस्याची बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एंट्री होणार आहे. आपल्या हजरजवाबी आणि स्पष्टवक्तेपणा यामुळे ज्यांना ओळखले जाते, ज्यांच्या कलर्स मराठीवरील कार्यक्रमातील “पक्या भाई” या पात्राला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली असे नंदकिशोर चौघुले वाइल्ड कार्ड एंद्वारे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जाणार आहेत. यांच्या हजरजवाबी आणि स्पष्टवक्तेपणा कोणाला पटेल ? कोणाला पटणार नाही ? हे बघणे रंजक असणार आहे. नंदकिशोर चौघुले बिग बॉस मराठीबद्दल बोलताना म्हणाला, “या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जाताना माझी कुठल्याही प्रकारची स्ट्रर्जी नसणार आहे. कारण या घरामध्ये त्याचा निभाव लागणार नाही. या घरामध्ये तुम्ही माणूस म्हणून कसे वागता, कसे रहाता यावर हा खेळ निर्धारित आहे. मला असं वाटत या घरामध्ये खऱ्या स्वभावावर टिकून रहावं ... आणि स्वत:ला तपासावं. घरामध्ये जाताना कशाची भीती वाटते आहे असं विचारल्यास तो म्हणाले, “मला कशाचीही भीती वाटत नाही. कारण, लोकांमध्ये माझी प्रतिमा काय आहे याचा मी कधीच विचार केला नाही, मी सादर करत असलेल्या पात्राची प्रतिमा नेहेमी जमली. पण, इथे स्वत: मीच असणार आहे. त्यामुळे आलेल्या प्रसंगांना तोंड द्यायचे ... घरामध्ये टिकून रहायचे हेच माझे ध्येय असणार आहे”.तुझा हजरजवाबी आणि स्पष्टवक्तेपणा बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दिसेल का ? असे विचारल्यास तो म्हणाले, “नक्कीच दिसेल... माझ्या घरीसुध्दा वागताना मी कधीच मागून बोलत नाही, किंवा तोंडदेखल वागत नाही. असं माझ्याबाबतीत कधीच घडलं नाही. त्यामुळे माझ्या स्पष्टवक्तेपणा मुळे माझ्याकडे लोकं खूप जपून बोलतात. घरातील तगडे स्पर्धक कोण वाटतात असे विचारल्यावर तेव्हा तो म्हणाले मेघा आणि सई... तसेच अंतिम सोहळ्याची मी तयारी करूनच आलो आहे आणि मेघा, सई आणि मला मी टॉपमध्ये बघतो असे तो म्हणाला.