Join us

वयानं 14 वर्षानं लहान अभिनेत्रीसह रेशीमगाठीत अडकणार हा अभिनेता !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2017 6:06 AM

सेलिब्रिटींचं एकमेंकांशी सूत जुळणं आणि त्यांनी एकत्र रेशीमगाठीत अडकणं ही काही नवी बाब राहिली नाही. अनेक कलाकार आपल्या कोस्टारशी ...

सेलिब्रिटींचं एकमेंकांशी सूत जुळणं आणि त्यांनी एकत्र रेशीमगाठीत अडकणं ही काही नवी बाब राहिली नाही. अनेक कलाकार आपल्या कोस्टारशी लग्न करुन जन्मोजन्मीच्या बंधनात अडकतात. यांत आता आणखी एका कलाकार जोडीची भर पडली आहे. 'सूर्यपुत्र कर्ण' आणि 'सरस्वती चंद्र' यासारख्या मालिकांमधून रसिकांच्या भेटीला आलेला अभिनेता गौतम रोडे आता विवाहबंधनात अडकणार आहे. विशेष म्हणजे 40 वर्षीय गौतम त्याच्यापेक्षा 14 वर्षाने लहान असणा-या अभिनेत्री रेशीमगाठीत अडकणार आहे. गौतमची होणा-या जीवनासाथीचं नाव पंखुडी अवस्थी असं आहे.पंखुडी गौतमपेक्षा वयाने 14 वर्ष लहान आहे.2018च्या सुरुवातीला दोघंही लग्नबंधनात अडकणार असल्याचे बोललं जात आहे. पंखुडी सध्या छोट्या पड्यावरील क्या कुसूर है अमला का या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. लग्नासाठी गौतमनंच पुढाकार घेतला आहे. त्याने आधी पंखुडीला प्रपोज केलं आणि त्याच्या प्रपोजला पंखुडीनेही होकार दिल्याचं समजतंय. दोघांच्या या नात्याला त्यांच्या कुटुंबीयांचाही पाठिंबा आहे. दोघांचेही आई वडिल एकमेकांना भेटले आहेत. मियाँ बिबी राजी तो क्या करेगा..... या उक्तीनुसार वयात फरक असतानाही दोघांच्याही पालकांचा लग्नाला पूर्णपणे पाठिंबा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दोघंही एकमेकांना डेट करत आहेत. लग्नाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसं दोघांमधलं प्रेमाचं नातं आणखी बहरु लागलं आहे. पंखुडी तर आता गौतमच्या घराजवळच शिफ्ट झाली आहे. सूर्यपुत्र कर्ण .या मालिकेच्या सेटवर गौतम आणि पंखुडीची पहिल्यांदा भेट झाली. या मालिकेत गौतमनं कर्ण ही भूमिका साकारली होती. तर पंखुडीने द्रौपदीची भूमिका साकारली होती. या मालिकेच्या सेटवर दोघांमध्ये चांगली मैत्री निर्माण झाली. हळूहळू या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. आता याच प्रेमाचं नव्या नात्यात लवकरच रुपांतर होणार आहे. दोघंही रेशीमगाठीत अडकणार असून त्यांच्या भावी आयुष्याला आमच्याही शुभेच्छा.