Join us

'तू लग्न कधी करणार?' या प्रश्नावर उत्तर देताना अभिनेता यशोमान आपटे म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 13:28 IST

यशोमन आपटेनं त्याच्या लग्नाच्या चर्चांवर उत्तर दिले आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीत गेल्या काही दिवसांपासून लग्न सोहळ्यांना उधाण आले आहे. अशातच प्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्रींची लगीनघाई देखील पाहायला मिळत आहे. आता 'चॉकलेट बॉय' अशी ओळख असलेला यशोमन आपटेच्या चाहत्यांना त्याला बोहल्यावर चढताना पाहायची इच्छा आहे. नुकतेच यशोमन आपटेनं एका मुलाखतीत त्याच्या लग्नाच्या चर्चांवर उत्तर दिले आहे.

यशोमान आपटेनं its.majja ला मुलाखत दिली. यावेळी खऱ्या आयुष्यात कशी मुलगी हवी आहे या प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणाला, 'माझ्या डिमांड खूप आहेत. पण, तसं म्हटलं तर नाहीयेत सुद्धा. आता मी कसं सांगू कळत नाहीये. म्हणजे मी लग्नाबद्दल जास्त विचार नाही केला आहे. सध्या तरी माझ्या डोक्यात लग्नाचा विचार नाही आहे आणि मी खरं सांगतोय माझ्या आयुष्यातदेखील कोणी नाही'. यशोमान आपटेनं सध्या तरी तो सिंगल असल्याचं सांगितलं आहे.

यशोमान आपटे सध्या तो स्टार प्रवाह वाहिनीवरील 'शुभविवाह' या मालिकेत झळकताना दिसत आहे. यशोमनला 'फुलपाखरु' या मालिकेमुळे घराघरात नवी ओळख मिळाली. त्याने या मालिकेत ऋता दुर्गुळेबरोबर मानस हे पात्र साकारलं होतं. यशोमन आपटे हा सोशल मीडियावरदेखील सक्रिय असतो. या माध्यमातून तो चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. तसेच स्वत:चे अनेक फोटो शेअर करत अनेक ट्रेडिंग रिल बनवत चाहत्यांच्या संपर्कात असतो. यशोमान आपटेने ‘35 टक्के काठावर पास’ या चित्रपटापासून त्याच्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्याने ‘झोपाळा’ या नाटकात काम केले होते.

टॅग्स :यशोमन आपटेसेलिब्रिटीमराठी अभिनेता