मालिकेत पाहायला मिळणार अभिनेत्री झिनल बेलाणीचे मादक रूप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2017 11:12 AM
‘हर मर्द का दर्द’ या नव्यानेच सुरू झालेल्या विनोदी मालिकेत भूमिका साकारणारी गुजराती अभिनेत्री झिनल बेलाणी आगामी भागात सेक्सी ...
‘हर मर्द का दर्द’ या नव्यानेच सुरू झालेल्या विनोदी मालिकेत भूमिका साकारणारी गुजराती अभिनेत्री झिनल बेलाणी आगामी भागात सेक्सी लुक असणारे कपडे परिधान करायचे होते.कथानकानुसार ती आपला पती विनोद खन्ना (फैझल रशीद) याला आपल्या मादक सौंदर्याद्वारे आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत असते. मालिकेच्या कथानकानुसार, विनोद आणि सोनू (झिनल बेलाणी) यांच्यात अबोला सुरू असतो. विनोदने आपल्याला ‘सॉरी’ म्हणावे असे सोनूला वाटत असते, परंतु विनोद त्यास तयार नसतो. तेव्हा आपल्या मादक सौंदर्याद्वारे त्याला आपल्याकडे आकर्षित करून त्याच्याकडून ‘सॉरी’ म्हणवून घेण्याचा ती प्रयत्न करते. परंतु विनोद वेळीच त्या खोलीतून बाहेर निघून जातो. झिनलला या मादक रूपाबद्दल विचारले असता ती म्हणाली, “या भागात मला मादक आणि आकर्षक दिसणं गरजेचं होतं.मी ते सहज साध्य केलं. मी आतापर्यंत सोनूची जी व्यक्तिरेखा साकारत आहे, त्यापेक्षा माझा हा लूक अगदीच भिन्न होता.यात माझं मादक सौंदर्य अधोरेखित करण्यात आलं आहे. ते कपडे घालण्यात मला कसलाच संकोच वाटला नाही. माझे दिग्दर्शक आणि सहकलाकार फैझल यांच्याबरोबर इतके मोकळेपणाचे संबंध आहेत की मला तो प्रसंग उभा करताना काहीच त्रास किंवा संकोच वाटला नाही. त्यांनी माझ्यावर कोणतंही दडपण आणलं नाही आणि तो प्रसंगही छान साकारला आहे.”मालिकेच्या टीमला झिनलने आपण कधीही इंटिमेट सीन्स देणार नाही असा कॉन्ट्रॅक्टच साईन करून आहे. तरीही एके दिवशी मालिकेचे दिग्दर्शक परमित सेठीने झिनलला फैझलसह इंटिमेट सीन शूट करावा लागेल, असे सांगितले. मुळात हा प्रसंग बाथरूममध्ये शूट करायचा होता आणि त्यात फैझल आणि झिनलचा एक किसींग सीन शूट करायचे होते. मात्र ती आधीपासूनच ठरवल्याप्रमाणे असे सीन्स शूट करताना संकोच वाटत असल्यामुळे तिने असे प्रसंग करण्यास साफ नकार दिला होता.