Join us

दाक्षिणात्य गाण्यावर नारकर जोडप्याचा जबरदस्त डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 18:06 IST

ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांचे रिल्स प्रेक्षकांना प्रचंड आवडतात.

Aishwarya Narkar Video: ऐश्वर्या नारकर  (Aishwarya Narkar) आणि अविनाश नारकर (Avinash Narkar) हे मराठी सिनेसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत असणारं कपल आहे. गेली अनेक वर्ष नारकर जोडपं कलाविश्वात सक्रिय आहे. आपल्या अभिनयासह ते सोशल मीडियावरही  चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांचे ट्रेंडिंग गाण्यावरील रिल्सची सुद्धा सोशल मीडियावर चर्चा असते. आता त्यांचा सोशल मीडियावरदेखील एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला आहे. अशातच नुकताच या दोघांनी एक नवीन व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सुद्धा नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे.

ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांनी ट्रेंडिंग दाक्षिणात्य गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांच्या डान्स स्टेप्स चाहत्यांना आवडलाय. या शिवाय व्हिडीओमधील त्यांचे हावभाव देखील लक्ष वेधून घेत आहेत. या रीलमधील दोघांची एनर्जी पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. ऐश्वर्या-अविनाश यांच्या या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊसचा पाडलाय. खूप छान, एव्हरग्रीन कपल अशा कमेंट करच यूजर्स त्याचं कौतुक करताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर अलिकडेच झी मराठीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत दिसल्या. या मालिकेत त्यांनी साकारलेल्या खलनायिकेच्या पात्राला प्रेक्षकांची पसंती मिळाली. तर अविनाश नारकर स्टार प्रवाह वाहिनीवरील 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत काम करताना दिसत आहेत. 

टॅग्स :ऐश्वर्या नारकरअविनाश नारकरटिव्ही कलाकारसोशल मीडिया